मुलांना पोहण्यास शिकविण्यास गेलेल्या मातेचा बुडुन मृत्त्यु

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

मुलांना पोहण्यास शिकविण्यास गेलेल्या महिलेला चक्कर येवुन विहीरीत पडुन बुडाल्याने जीव गमवावा लागल्याची घटना आज (ता.13) सायंकाळी नेज (ता. चिक्कोडी) येथे घडली. शिल्पा मलगोंडा चन्नगैाडर (वय-34) असे मृत महिलेचे नाव आहे.

सदलगा - मुलांना पोहण्यास शिकविण्यास गेलेल्या महिलेला चक्कर येवुन विहीरीत पडुन बुडाल्याने जीव गमवावा लागल्याची घटना आज (ता.13) सायंकाळी नेज (ता. चिक्कोडी) येथे घडली. शिल्पा मलगोंडा चन्नगैाडर (वय-34) असे मृत महिलेचे नाव आहे. 

सद्या मुलांना दसऱयाची सुट्टी असल्याने व स्वताला पोहता येत असल्याने शिल्पा हिने आपल्या सुदर्शन व सुजल या दोन्ही मुलांना पोहण्यास शिकविण्यासाठी विहीरीवर गेल्या होत्या. मुलांना पोहण्यास शिकवित असताना त्यांना चक्कर आल्याने त्याच विहीरीत पडुन बुडाल्या.

मोठा मुलगा सुदर्शन याने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरीक जमा झाले. पण तोवर शिल्पा या पाण्यात बुडाल्या होत्या. पोलिसांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मंडल पोलिस निरीक्षकांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला. सदलगा येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

शिल्पा या मुळच्या एैनापूर (ता. गडहिंग्लज) येथील असुन 14 वर्षापूर्वी त्यांचा नेज येथील शेतकरी मलगैाडा यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना स्वताला पोहता येत होते पण तंबाखुची मिश्री लावल्याने त्यांना चक्कर येवुन त्या विहीरीत पडल्या. पावसामुळे विहीरींना अधिक पाणी असल्याने त्या बुडाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother death by drown