Mother's Day : शेतकरी चळवळीचे प्रेरणास्थान माझी आई रत्नाबाईच

Mother's Day : शेतकरी चळवळीचे प्रेरणास्थान माझी आई रत्नाबाईच

रत्नाबाई शेट्टी यांनी आपली सहा मुले आणि तीन मुली यांच्यासह कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी पहिल्यापासूनच कष्ट घेतले. शेतकरी कुटुंबातील रत्नाबाई यांनी घेतलेले कष्ट एखाद्या मॅनेजमेंटमधील अभ्यासाचा भागच आहे. रत्नाबाई यांना शेती पिकवण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि मिळणारे उत्पन्न याची इत्थंभूत ज्ञान होते. कुटुंबाचा गाडा चालविताना घरातील कामे पाहून शेतीत पतीला त्या मदत करायच्या.

मुलांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी त्या आग्रही होत्या. यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या वडिलांच्या बरोबरीने आई रत्नाबाई यांचा सिंहाचा वाटा आहे. मुले लहान असताना पतीचे छत्र हरवले; पण न डगमगता संसाराचा गाडा ओढण्याची जबाबदारी रत्नाबाई यांनी समर्थपणे निभावली आहे. मुलांचे संसार उभे केले. शेतकऱ्यांची दुःखं आणि व्यथा त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणीतरी लढले पाहिजे, असे त्या नेहमी सांगत. याचेच बळ खासदार राजू शेट्टी यांना मिळाले. त्यांना लढण्यासाठी आईने शिकवण देऊन रस्ताही दाखवला.

राजू शेट्टी जिल्हा परिषद, आमदार आणि खासदार झाल्याचे पाहून त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो; पण शेतकऱ्यांसाठीच पाय जमिनीवर ठेवून लढणाऱ्या मुलांकडे पाहून त्यांना आपण दिलेल्या संस्काराचे बीज रुजल्याचे पाहून त्यांना समाधान वाटते. रत्नाबाई आजही शेतात जाऊन, शेतातील परिस्थितीचा आढावा घेतात. एकदा रानडुकराच्या जीवघेण्या हल्ल्यातून त्या बचावल्या. लाखो शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळे त्या वाचल्या. त्या आजही मुलगा राजू शेट्टींना म्हणतात, जरा शेताकडे लक्ष दे.  खासदार राजू शेट्टी म्हणतात, माझ्याबरोबरच शेतकरी चळवळीचे प्रेरणास्थान माझी आई रत्नाबाईच आहे. शेतकरी चळवळ चालवित असताना, अनेकवेळा कटू प्रसंग आले. या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आशीर्वाद आणि बळ हे तिनेच दिले. यामुळेच शेतकरी चळवळीला बळ आले. आई आज खापरपंजी झाली आहे. आमच्या भावंडांचे संसार जरी फुलत चालले असले तरी, शेतकऱ्यांचे संसार फुलवण्यासाठी तिची साथ मोलाची, तसेच प्रेरणादायी ठरली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com