सांगली : मोकाट घोड्याने घेतला तरुणाचा बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

कवठेपिरान ते लक्ष्मी फाटा दरम्यान पावसाने वाढलेले गवत चरण्यासाठी घोडी सोडण्यात येतात. ती रात्रभर तशीच या रस्त्यावर मोकाट फिरत असतात. कसबे डिग्रज, कवठेपिरान, समडोळी या भागात या घोड्यांचा वावर असतो.

तुंग ( सांगली ) - कवठेपिरान सांगली रस्त्यावर मोटार सायकलला घोड्याची अचानक धडक बसून झालेल्या अपघातामध्ये एक युवक ठार झाला. कृष्णात आण्णासो जाधव (३५) असे मृत युवकाचे नाव आहे. 

अबब ! बोकडाचे मटण 520 रुपये किलो 

याबाबत मिळालेली माहिती अशी, कवठेपिरान ते लक्ष्मी फाटा दरम्यान पावसाने वाढलेले गवत चरण्यासाठी घोडी सोडण्यात येतात. ती रात्रभर तशीच या रस्त्यावर मोकाट फिरत असतात.
कसबे डिग्रज, कवठेपिरान, समडोळी या भागात या घोड्यांचा वावर असतो. यामुळे वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर छोटेमोठे अपघात नेहमीच घडतात. 

सांगली : वाळव्यातील ‘त्या’ तरुणासह दहा जण एटीएसच्या ताब्यात 

शुक्रवारी (ता.१) अशाच मोकाट घोड्यामुळे कवठेपिरानच्या कृष्णात यांचा अपघात झाला. मिरजेतील पाहुण्यांना दिवाळीचा फराळाचे देऊन तो रात्री येत होता. एस्सार पेट्रोलपंपाजवळ  रस्त्याकडेचे गवत खाण्यासाठी सोडलेला घोडा अचानक रस्त्यावर आला. कृष्णात यांच्या मोटारसायकलला त्याची धडक बसली. या अपघातामध्ये कृष्णात यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला तात्काळ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आज (रविवारी) उपचार सुरु असतानाच त्याचा मुत्यृ झाला.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पडळकरांनी घातले दंडवत 

घरातील कर्ता पुरूष हिरावला

कृष्णात जाधव हा बन्सी पेपर मिलमध्ये कामाला होता. तो एकुलता होता. त्याच्यावरच घराची जबाबदारी होती. आई शेतमजुरी करते. कृष्णात यांना दोन मुले आहेत.

कोकणी शेतकरी आदित्यनां म्हणाला, आत्महत्येशिवाय पर्याय नायं 

घोड्यांच्या मालकांवर कारवाईची मागणी

एका मोकाट घोड्याने या तरुणाचा बळी घेतला. कसबेडिग्रज, समडोळी, कवठेपिरान या परिसरात अशी अनेक मोकाट घोडी फिरत असतात. यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेत.  निष्काळजीपणाने किती जणाचे बळी घेतले जाणार ?  रस्त्याकडेला घोडी मोकाट सोडणाऱ्या या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी कवठेपिरान, समडोळी,  दुधगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सायकल चालवा; गुडघे वाचवा; डाॅ. अनंत जोशींचा स्वानुभवातून सल्ला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Motor Cycle Accident Due To Horse Youth Death In KavathePiran