दोन ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीत अण्णा हजारेंचे आंदोलन

Anna_Hazare
Anna_Hazare

राळेगणसिद्धी - देशातील जनतेला जलद गतीने न्याय मिळावा, सरकारी पातळवरील भ्रष्टाचाराला आळा बसावा, सरकारी कारभारातील अनियमितता आणि अधिकारी, पदाधिकारी यांच्या मनमानीला चाप बसावा, देशात स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी लोकपाल व लोकायुक्तांची नेमणुक करावी. तसेच शेतक-यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा या मागण्या सरकारला वारंवार करूनही सरकार तयार नसल्याने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दोन ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

देशात लोकपाल व लोकायुक्तांची तात्काळ नेमणुक करावी, तसेच स्वामी नाथन आयोगाप्रमाणे शेतीमालाला ऊत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, वृद्ध शेतक-यांना पेन्शन मिळावी अशी मागणी हजारे गेली अनेक दिवसापासून सरकारकडे करत आहेत.

या बाबत सरकार कोणताच सकारात्मक निर्णय घेत नसल्याने हजारे दोन ऑक्टोबरपासून माझा गाव माझे आंदोलन या धरतीवर राळेगणसिद्धी येथे बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे. सरकारने जनतेला निवडणुक काळात दिलेली अश्वासणे व मला ऊपोषणाच्या दरम्यान दिलेली अश्वासणे पाळली नाहीत. 

माझा गाव माझे आंदोलन या धरतीवर हजारे यांनी दिल्ली ऐवजी राळेगणसिद्धी येथेच आंदोलन करत आहे असेही सांगीतले. यावेळी हजारे यांनी कार्यकर्त्यांनाही आंदोलनासाठी राळेगणला येण्या ऐवजी आपला गाव, तालुका, किंवा जिल्हा स्तरावर आंदोलन करावे असेही अवाहन केले आहे. एकाच वेळी देशभरात असे आंदोलन व्हावे व जनतेचा दबाव सरकारवर तयार व्हाव व त्यातून सरकार आपोआप ते कायदे करण्यास राजी होईल अशी अटकळ हजारे यांची आहे. 

तसेच दिल्लीत आंदोलन केल्यास कार्यकर्त्यांचे होणारे हाल व त्यांना होणारा त्रास याचा विचार करता या वेळी आंदोलव राळेगणसिद्धीतच करण्यावर हजारे ठाम आहेतच. हजारे येत्या महिनाभर केंद्र सरकार वरील कायद्याबाबत जनतेची दिशाभूल कशी करत आहे हे ही प्रसिध्दीस देणार आहेत असेही पत्रकात म्हटले आहे.

लोकपाल व लोकायुक्ताचा कायदा मंजूरीसाठी हजारे यांनी पहिले आंदोलन दिल्लीत केले मात्र तो कायदा राळेगणसिद्धी येथे पुन्हा केलेल्या आंदोलनानंतरच सरकारने मंजूर केला होता. अताही लोकपाल व लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी दिल्लीत आंदोलणे केली पत्रव्यवहार झाला मात्र अता त्यांच्या नेमणुकीसाठीही राळेगणसिद्धीला आंदोलन केले तर य़श मिळणार का अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com