सनातनसह शिवप्रतिष्ठानवर बंदीसाठी दलित महासंघातर्फे राज्यभर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

आगामी निवडणुकीत दंगली घडवण्याचे कट कारस्थान सनातन संस्था व शिवप्रतिष्ठान संस्था करत आहेत. ते सगळं थांबलं पाहिजे यासाठी दोन्ही संघटनांवर बंदी घालावी, या मागणीसाठी तीन सप्टेंबरपासून दलीत महासंघातर्फे राज्यभर आंदोलन करणार आहे, अशी माहिती दलीत महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छींद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कऱ्हाड- आगामी निवडणुकीत दंगली घडवण्याचे कट कारस्थान सनातन संस्था व शिवप्रतिष्ठान संस्था करत आहेत. ते सगळं थांबलं पाहिजे यासाठी दोन्ही संघटनांवर बंदी घालावी, या मागणीसाठी तीन सप्टेंबरपासून दलीत महासंघातर्फे राज्यभर आंदोलन करणार आहे, अशी माहिती दलित महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छींद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

प्रा. सकटे म्हणाले की, देशात सध्य़ा अराजकतेची स्थिती आहे. जातीयवादी शक्तींचा मोठा प्रभाव वाढतो आहे. नालासोपारा येथे वैभव राऊत नावाच्या व्यक्ती वीस बॉम्बसह सापडला, ही काही भूषणावह बाब नाही. राऊतनंतर यादी मोठी वाढत गेली. त्यात साताऱ्याचाही तरूण सापडला. जे कोणी तरूण सापडले ते सारे जण हिंदुत्वावादी संघटनांसाठी काम करत असल्याचे दिसून येते. त्यात सनातन संस्था व शिव प्रतिष्ठानशी संबंधीत त्यांचे कार्य होते. या दोन्ही संस्था देशाच्या लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आलीच पाहिजे.

राऊतसह जो कोणी सापडला त्याचा आमच्याशी काहीही संबध नाही, अशी भुमिका संबंधित संस्था घेतात. संस्थांची भुमिका अत्यंत चुकीची आहे. बहुजन समाजातील युवकांना धर्मांधतेच्या नावाखाली डोकी भडकावून त्यांना बहुजनांच्या हिताचे विचार मांडणाऱ्यांचे खून करायला लावणे म्हणजे मनुवादी शक्तींना आपले राज्य करण्याचे मनुसबे बळकट करण्याचा प्रकार आहे. शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे याच प्रकाराचे कार्य करतात. त्यांच्यात अन् अतिरेक्यांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे अशा संस्था देशाच्या लोकशाहीस धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आलीच पाहिजे. यासाठी जनजागृतीसह थेट आंदोलन करण्याचा निर्णय दलीत महासंघाने घेतला आहे. ते आंदोलन लोकशाही मार्गाने असणार आहे. तीन सप्टेंबरला एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण राज्यभर होणार आहे. 

प्रा. सकटे म्हणाले, शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांच्यासह मिलींद एकबोटे, सनातनचे जयंत आठवले यांची चौकशी झाली पाहिजे. आठवले, भिडे यांच्यावर चार ते पाच दंगली पेटवल्याचा आरोप आहे. त्या दोघांना पोलिस खात्याने किमान पाचवेळा दंगली घडू नयेत, यासाठी स्थानबद्ध केल्याच्याही घटना आहे. नालासोपारा येथे सापडेलेल्या बाम्ब प्रकरणाताही त्यांची चौकशी झाली पोहिजे. डॉ. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येमागे सनातनचा नक्कीच संबंध आहे. त्या प्रकरणात जयंत आठवले यांची चौकशी होण्याची गरज आहे.

बहुजनांच्या विकासाचे विचार मांडणाऱ्या लोकहीतवादी विचारांच्या सुधारकांना बहुजन तरूणांकडून संपवले जात आहे. अशा मनुवादी विचाराचे राज्य आणण्याच्या ब्राम्हण्यवादी शक्तींच्या विरोधात दलीत महासंघ आक्रमक होणार आहे. त्यासाठी पुढच्या काळात संविधान हाच अभिमान अशी रॅलीही काढण्याचे नियोजन आहे. काही ठिकाणी चर्चासत्रे घेण्यात येणार आहेत. त्याचाच भाग म्हणून सनातन संस्था व शिप्रतिष्ठानवर बंदी आणण्यासाठी दलीत महासंघ राज्यभर आंदोलन करणार आहे.

Web Title: Movement of Dalit Mahasangh for the ban on Shiv Pratishthan and sanatan from 3 sep