मंगळवेढ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे बेमुदत धरणे आंदोलन

दावल इनामदार
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

ब्रम्हपुरी - माचणुर (मंगलवेढा) येथील प्रतीक मधुकर शिवशरण या ९ वर्षाच्या निष्पाप बालकाची हत्या करून एक महिन्याचा कालावधी उलटूनही अद्यापही खरा मारेकारी कोण याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. एकाला संशयीत आरोपी म्हणून पकडण्यात आले. परंतु, त्याचा अद्यापही उलगडा होत नाही. 

प्रतीक शिवशरण हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करावे व बेजबाबदार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच दलित मुस्लिम तरुणांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना फोडून काढावे असे म्हणणाऱ्या डीवायएसपी भाग्यश्री नवटंके यांना निलंबित करून त्यांच्यावर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करावा यासाठी दिनांक बुधवार( ता.५ ) पासून प्रांताधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटा कडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे. 

या आंदोलनास अनेक संघटनांनी पाठिंबा दिला असून पोलिस प्रशासनाच्या विरोधात नाराजी आहे. या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र संघटक पारप्पा ढावरे, येताळा भगत, संजय देशमुख, रियाज मुजावर, सिद्धेश्वर खरबडे, नवनाथ महाराज, महेश डावरे आदिजन त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: movement in the Mangalwedha by Republican Party of India