नेवाशात मुस्लिम समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन

सुनील गर्जे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

शैक्षणिक व नोकरीत पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मुस्लीम समाज आरक्षण कृती समितीचे समन्वयक युवा नेते इम्रान दारुवाले यांच्यासह सात आंदोलकांना नेवासे पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करत अटक केली. यावेळी आंदोलकांनी "एकच मिशन.. मुस्लीम आरक्षण" या घोषणा दिल्या. अटक केलेल्या आंदोलकांना नेवासे न्यायालयात हजर केले असता आंदोलकांनी जामीन नाकारल्याने त्यांना शनिवार (ता. 17) पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

नेवासा: शैक्षणिक व नोकरीत पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मुस्लीम समाज आरक्षण कृती समितीचे समन्वयक युवा नेते इम्रान दारुवाले यांच्यासह सात आंदोलकांना नेवासे पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करत अटक केली. यावेळी आंदोलकांनी "एकच मिशन.. मुस्लीम आरक्षण" या घोषणा दिल्या. अटक केलेल्या आंदोलकांना नेवासे न्यायालयात हजर केले असता आंदोलकांनी जामीन नाकारल्याने त्यांना शनिवार (ता. 17) पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

सकल मुस्लीम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 13) रोजी आंदोलनाचे समन्वयक इम्रान दारुवाले, नगरसेवक अल्ताफ पठाण, अब्बास बागवान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजाच्या आंदोलकांनी नेवासे येथील खोलेश्वर चौक ते तहसील कार्यालय अशा मूकमोर्चाने जावून आरक्षणाच्या मागणीसाठी ता. 16 ऑगस्ट रोजी प्रवरासंगम (ता. नेवासे) येथील गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन करण्यासाठीचे निवेदन महसूल व पोलिस प्रशासनास दिले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी निवेदन स्वीकारताच त्यावर नावे असलेल्या इम्राम दारुवाले, सलमान शेख, कय्युम शेख, फारूक शेख, जाकीर शेख, शरीफ शेख व अजीज पठाण या सात आंदोलकांना ताब्यात घेत अटक केली.

यावेळी आंदोलकांनी घोषणा देत एकाच गोंधळ केला होता मात्र डॉ. गोर्डे यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केल्यावर वातावरण निवळले.

Web Title: Movement for the reservation of Muslim community in Nevasa