उद्यापासून शाळा कृती समितीचे नागपूर येथे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

राज्यात उच्च माध्यमिक शाळांसाठीचा कायम विनाअनुदानित
हा शब्द काढून जवळपास साडेचार वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र,
अद्यापही त्यांना अनुदान देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे विना अनुदानित
उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्यावतीने उद्यापासून (सोमवार) नागपूर येथे
बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

सोलापूर - राज्यात उच्च माध्यमिक शाळांसाठीचा कायम विनाअनुदानित
हा शब्द काढून जवळपास साडेचार वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र,
अद्यापही त्यांना अनुदान देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे विना अनुदानित
उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्यावतीने उद्यापासून (सोमवार) नागपूर येथे
बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

कृती समितीचे राजाध्यक्ष तानाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 210
आंदोलने करण्यात आली आहेत. मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात अधिवेशन
संपण्यापूर्वी पात्र शाळांची यादी घोषित करण्याचे आश्‍वासन शिक्षणमंत्री
विनोद तावडे यांनी दिले होते. त्यानंतर संघटनेच्यावतीने बारावीच्या पेपर
तपासणीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर राज्यातील केवळ 146 अनुदान पात्र उच्च
माध्यमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील
केवळ दोन शाळांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 106 शाळांचे प्रस्ताव आयुक्त कार्यालयात असतानाही केवळ दोन शाळांचीच घोषणा केल्याने उर्वरित 104 शाळांमधील प्राध्यापकांवर अन्याय केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी या शाळांची यादी तीन जुलैला घोषित करतो असे सांगितले होते. मात्र, जुलैला पहिला आठवडा संपला. तरीही, यादी घोषित केलेली नाही. त्यामुळे ही यादी लवकर घोषित करण्यासाठी उद्यापासून नागपूर येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष
अमरसिंह खांडेकर, श्रीधर सगेल, नीलेश नागणे, प्रशांत नागुरे, दिगंबर क्षिरसागर उपस्थित होते.

उद्यापासून (सोमवार) नागपूर येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. या
आंदोलनासाठी विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमधील प्राध्यापकांनी
उपस्थित राहावे आवाहन यावेळी सोलापूर जिल्हा विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे अध्यक्ष अमरसिंह खांडेकर यांनी केले आहे.

Web Title: The movement of the school committee from Nagpur on Thursday