बाबासाहेबांचा जीवनपटाचे सोलापुरात 'डिजिटल' दर्शन

विजयकुमार सोनवणे
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

महापालिकेच्या ठरावानुसार शासनाकडे जागेची मागणी केली आहे. जागा उपलब्ध झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला साजेशा स्मार्ट उद्यानाची निर्मिती केली जाईल. जागा उपलब्ध होण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीत आहे. 
- आनंद चंदनशिवे, गटनेता बसप सोलापूर महापालिका
 
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट डिजिटल सिस्टिमद्वारे सादर केला जाणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ही सुविधा होणार आहे. 

नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानात "डॉ. बाबासाहेब आंबेडकर' उद्यान साकारण्यात येणार आहे. त्यासाठी एक एकर जागा विनाशुल्क महापालिकेस देण्याची मागणी करण्यात आली असून, त्याचाही पाठपुरावा करण्यात येणार आहे. 

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात डिजिटल स्क्रीन लावण्यात येणार आहे. महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, विजय बमगुंडे यांच्यासह स्मार्ट सिटी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

सध्या असलेल्या पुतळ्याच्या मागील एक एक जागा (4096.00 चौरस मीटर) महापालिकेस हस्तांतरण केल्यास त्या ठिकाणी उद्यान साकारण्यात येईल, नागरिकांना बसण्याची जागाही करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी कोंडीही टाळता येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या ठरावानुसार प्रस्तावित जागा महापालिकेकडे विनाशुल्क हस्तांतरित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या ठरावानुसार शासनाकडे जागेची मागणी केली आहे. जागा उपलब्ध झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला साजेशा स्मार्ट उद्यानाची निर्मिती केली जाईल. जागा उपलब्ध होण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीत आहे. 
- आनंद चंदनशिवे, गटनेता बसप सोलापूर महापालिका
 
Web Title: movie on Babasaheb Ambedkar life