खासदार अॅड. शरद बनसोडे मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

मोहोळ :  खासदार अॅड. शरद बनसोडे हे मंगळवार (ता.12) जुनला मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मोहोळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष नामदे यांनी दिली.

मोहोळ :  खासदार अॅड. शरद बनसोडे हे मंगळवार (ता.12) जुनला मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मोहोळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष नामदे यांनी दिली.

तालुक्यातील मसले चौधरी येथील ग्रामदैवत शंभु महादेव मंदिराच्या सभामंडपासाठी बनसोडे यांच्या फंडातुन दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्या मंदिराच्या शिखराचे भूमीपुजन सकाळी नऊ वाजता बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर भाजपाच्या संपर्क फॉर समर्थन या उपक्रमांतर्गत नरखेड येथे ग्रामस्थांच्या गाठी भेटी त्यानंतर मोहोळ येथील खासदार संपर्क कार्यालयात जनतेच्या समस्या ऐकुन घेऊन त्यांच जागेवरच निपटारा करणार आहेत.

 दुपारी दिड ते साडेतीन या वेळेत तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी अधिकारी पोलीस अधिकारी यासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात संपर्क फॉर अभियानांतर्गत प्रमुख पदाधिकारी डॉक्टर, वकील यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

दौऱ्यात बनसोडे यांच्या समवेत तालुका अध्यक्ष सतीश काळे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शंकरराव वाघमारे माजी शहराध्यक्ष अविनाश पांढरे जिल्हा चिटणीस सतिश पाटील प्रसिद्धी प्रमुख महेश सोवनी, रमेश माने, दिलीप कदम, संजय वाघमोडे, आनंद कुचेकर, तानाजी बनसोडे, उपस्थित राहणार आहेत.

Web Title: MP adv. Sharad Bansode on the tour of Mohol Taluka