Vidhan Sabha 2019 : सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले : खा. कोल्हे

Vidhan Sabha 2019 : सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले : खा. कोल्हे

मंगळवेढा : गेल्या पाच वर्षांत विद्यमान सरकारने शेतकरी, कष्टकरी तरुण, महिला कामगार यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. जातीपातीत भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राने उधळून लावला, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, उमेश पाटील, समाधान फाटे, महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे, विष्णुपंत बागल, विजयसिंह देशमुख, किरण घाडगे, युवराज पाटील, विजयकुमार खवतोडे, भारत बेदरे, लतीफ तांबोळी यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भूमिका घेतली तोच विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राबवत आलेला असून, या निवडणुकीतून जनता पुरोगामी महाराष्ट्राला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. अन्यायाची चीड आणि सत्याची चाड धरणारी ही समोरील गर्दी बघता भारत नाना भालके यांच्या प्रचार सभेला नसून, विजयसभेला आल्याचे वाटत आहे. मंगळवेढा भूमीत येण्याचे भाग्य लाभले आणि पावसाने जंगी स्वागत केले, हे शेतकर्‍यांचे कल्याणच आहे.

भालके जनतेच्या मनातील उमेदवार असून, त्यांचे कार्यकर्तृत्व आभाळाएवढे आहे. म्हणूनच आज आभाळातून पाणी पडत आहे. हा विजयाचा शुभ संकेत आहे.

महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप उमेदवारांना महिलांनी योग्य जागा दाखवावी.

प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी केले. यावेळी पांडुरंग चौगुले, महेश पवार, यशवंत खताळ आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन भारत मुढे यांनी तर आभार अजित यादव यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com