कोल्हापूरः कसबा बावडा कुणाची जहागिरी नाही

कोल्हापूरः कसबा बावडा कुणाची जहागिरी नाही

कोल्हापूर - कसबा बावडा हा भाग आपल्याकडेच असल्याच्या भ्रमात काहीजण आहेत, पण हा भाग म्हणजे कुणाची जहािगरी नाही, या परिसरातून मला गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळतील, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. 

कसबा बावडा या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा  बालेकिल्ला असलेल्या परिसरात आज श्री. महाडिक यांच्यातर्फे ‘नाश्‍ता पे चर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या राजर्षी शाहू विद्यामंदीरच्या पटांगणात हा कार्यक्रम झाला.
श्री. महाडीक म्हणाले,‘मी अनेक कामे केली, त्याचे कौतुक करू नका, पण नावे तरी ठेवू नका. शहरासाठी मी निधी दिला नाही ही वस्तुस्थिती आहे. शहराला आमदार असतात, गावांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असतात. या सर्वांची कामे ठरलेली आहेत. ज्या गावांत आतापर्यंत आमदार किंवा खासदार गेलेला नाही अशा गावांना मी निधी दिला. निधी देताना त्या 
गावांतून मते किती मिळतील याचा विचार केला नाही. २०० ते ५०० मते असलेल्या गावांना निधी दिला.’

ते म्हणाले, मी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कामे केली. बास्केट ब्रीजबद्दल माझ्यावर टीका होते, पण हा ब्रीज काही खिशातून येत नाही. त्याला मंजुरी मिळाली आहे. २८ फेब्रुवारीला त्याचा पायाभरणी होता, पण निविदा लांबल्याने तो पुढे गेला. हे काम पूर्ण होणारच आहे. पण ज्यांच्या कारकिर्दीतील अनेक प्रकल्प अजूनही पूर्ण झालेले नाहीत, त्यांनी माझी बदनामी करणे योग्य नाही. बावड्यातील अनेकजण मला भेटतात, तुम्हालाच मतदान म्हणून सांगतात, पण भाऊ, मुलगा कामाला असल्याने उघडपणे उतरू शकत नसल्याचे ते सांगतात. बावडा कुणाची जहागीरी नाही, गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी या परिसरातून मला जास्त मतदान मिळेल.’

यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, प्रशांत जयवंत पाटील आदिंची भाषणे झाली. प्रास्ताविक ‘राजाराम’ चे अध्यक्ष हरिष चौगले यांनी केले. आभार रघूनाथ पाटील (बाबा) यांनी मानले. 

कार्यक्रमाला ‘राजाराम’ चे संचालक दिलीप उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, नारायण चव्हाण, शंकर चेचर, श्रीराम सोसायटीचे माजी संचालक प्रल्हाद उलपे, विलास पाटील, पृथ्वीराज महाडीक, रूपेश पाटील, सचिन चौगले, राहूल चौगले, बबलू चौगले, सर्जेराव चौगले, पांडूरंग चौगले (वाय.बी.), सत्यजित रणदिवे (टिल्लू) आदि उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com