पंचायत समिती सदस्यांकडून तालुक्याच्या विकासाचे कामः महाडिक

राजकुमार शहा
शनिवार, 5 मे 2018

गोटेवाडी (ता. मोहोळ) येथे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातुन सायकली महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.

मोहोळ : मोहोळ तालुक्याच्या विकासाची गेल्या अनेक वर्षाची उणीव भरून काढण्यासाठी मतदारांनी पंचायत समितीच्या सभापती समता गावडे यांना संधी दिली आहे. यापुर्वी सर्वसामान्याना न्याय न देता जवळच्या बगलबच्चांना पुन्हा पुन्हा लाभ देण्याची परंपरा मोडीत निघाली असल्याने विरोधक चुकीचा अपप्रचार करीत आहेत. आघाडीचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तालुक्याच्या विकासाचे काम करीत असल्याचे प्रतिपादन भिमाचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी केले. 

गोटेवाडी (ता. मोहोळ) येथे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातुन सायकली महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. त्या वेळी महाडिक बोलत होते, यावेळी व्यासपीठावर अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे सभापती समता गावडे, उपसभापती साधना देशमुख, श्रीधर बिरजे, पं स सदस्य सुनीता भोसले, डॉ. प्रतिभा व्यवहारे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, भिमाचे उपाध्यक्ष सतीश जगताप, अशोक भोसले, सर्जराव चवरे, दिपक पुजारी, बाळासो वाघमोडे, जालंदर होनमाने, अज्ञान होनमाने उपस्थित होते. 

यावेळी सभापती डोंगरे म्हणाले, जनतेने आघाडीच्या सदस्यावर विश्वास ठेवुन काम करण्याची संधी दिली आहे. तो विश्वास सार्थ करून दाखवू. या वेळी लोकशक्ती भिमा परिवाराचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.

Web Title: MP Dhananjay Mahadik in Mohol