खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीबाबत जाणणार मते

खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीबाबत जाणणार मते

कोल्हापूर - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीस होणाऱ्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या पाच-सहा दिवसांत मुंबईत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेणार असल्याचे समजते. 

श्री. पवार यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी उघड विरोधाची भूमिका घेतली होती.
आज पक्षाच्या शहर कार्यकर्त्यांत मुंबईत झालेल्या बैठकीचीच चर्चा होती. जे खासदार महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले नाहीत, ज्यांनी कधीही त्यांनी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख केला नाही, ज्यांनी पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याची दखल न घेता त्यांच्या ठराविक कार्यकर्त्यांत कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यांच्या प्रचारास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का जावे, ही भूमिका पक्षाचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी जाहीरपणे मांडली.  

याच भूमिकेशी ठाम असल्याचे त्यांनी त्यांना आज भेटावयास आलेल्या कार्यकर्त्यांना सांगितले.  धनंजय महाडिक राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झाले. पण त्यांचा कल राष्ट्रवादीपेक्षा इतर पक्षाकडेच असल्याचा गेले काही दिवस त्यांच्यावर आरोप होत आहे. त्यांची भाजपशी जवळीक वाढत आहे, अशीही कार्यकर्त्यांत चर्चा आहे. या चर्चेचे पडसाद काल मुंबईत पक्षाच्या झालेल्या बैठकीत उमटले. 

कार्यकर्त्यांनी काल बैठकीत आपल्या भावना मांडल्या. कदाचित पवार साहेब पुन्हा कार्यकर्त्यांशी चर्चा करतील, असे वाटते. तेच या बाबत योग्य निर्णय देतील व तो आम्हाला मान्य असेल.
- ए. वाय. पाटील,
राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, मानसिंग गायकवाड, निवेदिता माने, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्हा दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनीच का तोंड उघडायचे?
- आर. के. पोवार
, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com