खासदार महास्वामींच्या वकिलांनी यामुळे केली कारवाईची मागणी 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 15 डिसेंबर 2019

खासदार जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावरील सुनावणी जिल्हा जात पडताळणी समितीसमोर सुरू आहे. यातील तक्रारदारांनी आपल्या समर्थकांसह जात पडताळणी समितीच्या कार्यालयात येऊन गोंधळ घातल्याचा प्रकार घडल्याचे ऍड. संतोष न्हावकर यांनी सांगितले. 

सोलापूर : खासदार जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावरील सुनावणी जिल्हा जात पडताळणी समितीसमोर सुरू आहे. यातील तक्रारदारांनी आपल्या समर्थकांसह जात पडताळणी समितीच्या कार्यालयात येऊन गोंधळ घातल्याचा प्रकार घडल्याचे ऍड. संतोष न्हावकर यांनी सांगितले. 

हेही वाचा : स्मार्ट सोलापूरकारांनी काय केला ओव्हरस्मार्टपणा 
दमबाजी व धमकीची भाषा 

"तुम्ही लोक खासदारांना मॅनेज झालेले आहेत, आम्हाला ताबडतोब आमच्या बाजूने निर्णय द्या नाहीतर आम्ही आंदोलन करू, उपोषणाला बसू, आत्मदहन करू अशी दमबाजी व धमकीची भाषा वापरून न्यायालयाचा अवमान करून व न्यायालयावर अविश्‍वास दाखवल्या प्रकरणी तक्रारदार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई व्हावी, या घटनेच्यापूर्वी झालेल्या तारखांच्या सुनावणीदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मागवून या प्रकरणाच्या रेकॉर्डवर ठेवण्यात यावे अशा आशयाचा अर्ज खासदार जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्यातर्फे ऍड. संतोष न्हावकर यांच्याकडून दाखल करण्यात आला. यात खासदार जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्यातर्फे ऍड. संतोष न्हावकर व ऍड. योगेश कुरे काम पहात आहेत. 
हेही वाचा : युवती म्हणते, माझ्या होणाऱ्या बाळाचे चार बाबा... 
खासदारांच्या आक्षेपाचा अर्ज फेटाळला 

दरम्यान, तक्रारदार प्रमोद गायकवाड यांच्या अर्जावर खासदारांच्या वकिलांनी घेतलेला आक्षेप समितीने फेटाळून लावला. तक्रारदार प्रमोद गायकवाड व मिलिंद मुळे यांनी केलेला तक्रारी अर्ज कायदेशीर नाही. दिलेला तक्रार अर्ज कोणत्या कायद्याच्या आधारे आहे याचा उल्लेख नाही तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यातील तक्रारदारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक न लढवता अर्ज माघारी घेतला असल्याने ते बाधित पक्षकार होऊ शकत नाहीत. त्यांना खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्याविरुद्ध तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार नाही असा आक्षेप घेतला होता. या आक्षेपाचा खासदारांचा अर्ज समितीने नामंजूर केला आहे, असे प्रमोद गायकवाड यांनी कळविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Mahaswamy's lawyers demand action