Loksabha 2019 : भाजपला खेड्यापाड्यात नेण्यास हातभार लावला ही माझी चूकच

Loksabha 2019 : भाजपला खेड्यापाड्यात नेण्यास हातभार लावला ही माझी चूकच

शिराळा - भाजपला खेड्यापाड्यात नेण्यासाठी हातभार लावला ही माझी मोठी चूक होती. ज्यांनी आमच्या जीवावर कमळ फुलवले त्यावर मी जालीम तणनाशक शोधले आहे. आत्ता महाराष्ट्र कमळ मुक्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. येथे काँग्रेस कमिटीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सत्यजित देशमुख अध्यक्षस्थानी होते.

श्री. शेट्टी म्हणाले,‘‘सतेचा वापर कसा करावा हे काँग्रेसवाल्याना कळले नाही, पण त्यांना कळले. राजू शेट्टी, द्या पट्टी असा मी आहे. वर्गणी काढून निवडणूक लढवतो. मला समजून घेऊन मदत करा.’’
श्री. देशमुख म्हणाले,‘‘काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करून प्रचार करतील. एक दिलाने विजयासाठी प्रयत्नशील आहोत.’’ 
के. डी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हणमंतराव पाटील, संपतराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

फतेसिंगराव देशमुख, गोविंदराव जाधव, महादेव कदम, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, विजय खरात, पी. वाय. पाटील, मारुती भोसले, तानाजी कुंभार, सुजित देशमुख, सम्राट शिंदे, पी. जी. शिंदे, प्रतापराव यादव, संभाजी नलवडे, अभिजित पाटील, धनराजी नरुटे, भोजराज घोरपडे, नथुराम सावंत, विकासराव देशमुख, राम पाटील, देवेंद्र धस उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com