चंद्रकांत पाटील हे राज्यातील दोन नंबरचे अवैध धंदे करणारे मंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

कोल्हापूर - राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे राज्यातील दोन नंबरचे अवैध धंदे करणारे मंत्री आहेत. त्यांना कोणाकडून काय मिळते, याची मला पूर्ण माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी माझ्यावरचे आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांची कुंडली उघड करीन, अशी रोखठोक टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.

आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्री. शेट्टी सोमवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. तेव्हा त्यांना मंत्री पाटील यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, त्यांनी मंत्री पाटील यांच्यावर सडकून टीका केली. युतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरताना मंत्री पाटील यांनी शेट्टींवर आरोप केले होते. शेट्टींनी कारखानदारांशी सेटलमेंट केल्याचा तसेच आपले घर भरल्याचा आरोप केला होता. या टीकेला आज श्री. शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले.

कोणाकडे काय आहे, ते नेमकं बाहेर येईल
श्री. शेट्टी म्हणाले, ‘मंत्री पाटील यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. जे आरोप केले आहेत, ते सिध्द करण्यासाठी त्यांनी ईडी, सीबीआय, इनकमटॅक्‍स आदी संस्थांचा वापर करावा. त्यातून काय सिध्द होतं का ते पहावे. आरोप करण्यापेक्षा त्यांनी धाडी टाकून जनतेसमोर सत्य आणावे. माझी माहिती काढत असताना त्यांचीही माहिती काढावी. कोणाकडे काय आहे, ते नेमकं बाहेर येईल. त्यांना कोणी किती दिले, याची माहिती मला आहे. या सर्वावर बिंदू चौकात येऊन चर्चा करू.’ 

बिंदू चौकात येऊन चर्चा करावी
मंत्री पाटील यांना कोणी काय दिले, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. भाजपच्या कळपात १००-१२५ साखर सम्राट आहेत. त्यामुळे कोणा-कोणाला काय दिले, हे सांगण्यासाठी आमच्याकडे बरेच काही आहे. फक्‍त मंत्री पाटील यांनी आमच्याकडील माहिती ऐकायची तयारी ठेवावी. बिंदू चौकात येऊन त्यांना आम्ही ही माहिती सांगण्यास तयार आहोत, त्यांनीही बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याची तयारी ठेवावी, असे आव्हान श्री. शेट्टी यांनी पालकमंत्री पाटील यांना दिले.

Web Title: MP Raju Shetti comment