चौकीदार सज्जन कधी झाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

कार्यकर्त्यांचा बळी देऊन आघाडी करणार नाही, अशी भूमिका आपली असल्याचे सांगत शेट्टी यांनी आपण लाटेबरोबर जाणारे नाही तर देशात भाजपविरोधात लाट आपण तयार केल्याचा दावाही त्यांनी केला.

गडहिंग्लज - भाजप व शिवसेनेत युती होणारच होती. पण, लोकांना ती कितपत रुचेल हे सांगता येत नाही. चौकीदार चोर असल्याचे सर्वांना माहित होते. पण, तो सज्जन कधी झाला हे बघावे लागेल, अशा शब्दात खासदार राजु शेट्टी यांनी युतीवर टोला लगावला.

श्री. शेट्टी एका कार्यक्रमानिमित्त गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना स्वाभीमानी तीन जागावर ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.  श्री. शेट्टी म्हणाले, लोकसभेसाठी तीन जागा ही स्वाभीमानीची क्षमता आहे. गतवेळी 22 खासदार असणाऱ्या युतीने दोन जागा दिल्या होत्या. तिसरी आमचीच होती पण, चिन्ह शिवसेनेचे मिळाले होते. मग सात खासदार असणाऱ्यांना काय अडचण आहे.

कार्यकर्त्यांचा बळी देऊन आघाडी करणार नाही, अशी भूमिका आपली असल्याचे सांगत शेट्टी यांनी आपण लाटेबरोबर जाणारे नाही तर देशात भाजपविरोधात लाट आपण तयार केल्याचा दावाही त्यांनी केला.

श्री. शेट्टी म्हणाले,""स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठी दोन वर्षांपासून तयारी सुरु केली होती. हातकणंगले, वर्धा, बुलढाणा, माढा, परभणी, शिर्डी यासह सात ते आठ जागांचा यामध्ये समावेश होता. पण, दीडपट हमी भाव व कर्जमाफीच्या समान कार्यक्रमाला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने संमती दिली. स्वाभीमानीने क्षमतेइतक्‍याच जागा आघाडीकडे मागितलेल्या आहेत. स्वाभीमानीचा कार्यकर्ता विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारा आहे. सत्तेच्या मागे लागणारा नाही. लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्‍न लोकसभेत सोडवता येतात. त्या ठिकाणी स्वाभीमानीचे कार्यकर्ते गेले पाहिजेत, हीच भूमिका आहे.''

'स्वाभीमानी'चे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, धनाजी पाटील, अॅड. आप्पासाहेब जाधव, अरुण शिंत्रे, आनंदराव कुलकर्णी, बसवराज मुत्नाळे, सुभाष पाटील, सुधीर कानडे, राजकुमार पाटील, बाळासाहेब भोसले, विक्रांत नार्वेकर, अजित तुरटे आदी उपस्थित होते.

Web Title: MP Raju Shetty comment