Loksabha 2019 : सांगलीची वादग्रस्त जागा स्वाभिमानीला नको

Loksabha 2019 : सांगलीची वादग्रस्त जागा स्वाभिमानीला नको

सांगली - सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको असे खासदार राजू शेट्टी यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच जाईल व स्वाभिमानी ही जागा सोडेल, असे संकेत श्री. शेट्टी यांनी दिले. आम्ही वर्धा किंवा शिर्डी घेण्यास तयार आहोत, असेही श्री. शेट्टी म्हणाले.

श्री. शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसला इशारा दिला. उद्यापर्यंत निर्णय घेण्यास त्यांनी सांगितले. श्री. शेट्टी म्हणाले,  आम्ही माघार घेणार नाही. भाजप सरकारला घालवण्यासाठी एकाकी पद्धतीने लढायलाही तयार आहोत. 
सांगलीची जागा आम्हाला द्यायची असेल तर सगळे वाद संपवून आम्हाला द्यावी. एक मत होऊन निवडणूक लढवायची आहे. कारण आम्हाला भाजपला हरवायचे आहे..एकमत करा अन्यथा शिर्डी द्या, अशीही मागणी त्यांनी केली.

श्री. शेट्टी म्हणाले,  महाआघाडी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासाठी ही महाआघाडी आहे. आम्ही सहा जागा मागितल्या होत्या. पण सहा आम्हाला मिळणार नाहीत, हे माहीत होते.  आता मागणी आमची तीन जागांची होती. हातकणंगले, बुलढाणा, वर्धा या तीन जागा हव्या होत्या. शिर्डी घ्यायची तयारी दाखवली पण निर्णय लवकर होत नव्हता. काँग्रेस - राष्ट्रवादी या दोघांच्या कोट्यातून जागा द्यायच्या होत्या. सांगलीबद्दल आम्ही जास्त इच्छुक नाही. पण सांगली ही जवळ आहे म्हणून मागितले होती, असेही श्री. शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

श्री. शेट्टी म्हणाले, स्वाभिमानीने वसंतदादा घराण्यावर अन्याय केला. असे दर्शवले जात आहे. तसे काहीही नाही. आम्ही वर्धा किंवा शिर्डी घेण्यास तयार आहोत. विनाकारण स्वाभिमानीला पिंजऱ्यात उभे केले जात आहे. वसंतदादा यांनी शेतकऱ्यांच्या विषयी जे योगदान दिले त्याची आम्हाला जाणीव आहे. 

स्वाभिमानीकडे सक्षम उमेदवार नाही असे चित्र रंगवले जात आहे. पण दोन ते तीन उमेदवार स्वाभिमानीकडे आहेत, असेही श्री. शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com