विजेवर चालणाऱ्या बसगाड्या कोल्हापूरला द्या - संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

कोल्हापूर - कोल्हापूरला विजेवर चालणाऱ्या बसगाड्या देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांना आज दिले. श्री. सावंत यांनी लवकरच विजेवर चालणाऱ्या बसगाड्या कोल्हापूरला देण्याचे आश्‍वासन दिले. 

संभाजीराजे यांनी अवजड उद्योगमंत्री श्री. सावंत यांची आज संसदेत भेट घेतली. त्यांनी श्री. सावंत यांना कोल्हापूर महापालिकेने 12 जुलै 2019 ला केंद्राकडे फेम इंडिया स्कीम फेज दोनमधून बसगाड्या मिळाव्यात म्हणून प्रस्ताव पाठविलेला आहे. त्यावर तत्काळ निर्णय करून कोल्हापूरच्या जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी केली. यावर सावंत यांनी लवकरात लवकर कोल्हापूरला विजेवर चालणाऱ्या बसगाड्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. 

कोल्हापूरसारख्या प्रगतिशील शहरात प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सार्वजनिक वाहतुकीत विजेवर चालणाऱ्या बसगाड्या आल्या तर प्रदूषणात मोठ्या प्रमाणात कपात होऊ शकते. केंद्र सरकारने देशभरात येणाऱ्या काळात स्वच्छ ऊर्जेला प्राथमिकता दिली आहे. पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने येणाऱ्या काळात कमी होतील. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण तर कमी होईलच, त्याचबरोबर भारताचे तेलाबाबत दुसऱ्या देशावर असलेले अवलंबित्वही कमी होईल. त्यामुळे केंद्र सरकारच्या दूरदृष्टीचे कौतुक केले पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhajiraje Chhatrapati comment