Maratha Reservation : यशाचे सर्व श्रेय मराठा समाजातील सर्व घटकांना - संभाजीराजे

Maratha Reservation : यशाचे सर्व श्रेय मराठा समाजातील सर्व घटकांना - संभाजीराजे

कोल्हापूर - मराठा समाजाने आरक्षणासाठी 53 मोर्चे शांततेने काढून आपल्या भावना शासनदरबारी पोहोचवल्या. यासाठी आरक्षणाच्या यशाचे सर्व श्रेय मराठा समाजातील सर्व घटकांना दिले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. 

उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणावर दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मी कौतुक करतो व आभार मानतो. त्यांनी न्यायालयात सरकारची बाजू चांगल्या पद्धतीने मांडली. त्यामुळेच न्यायालयात बाजू टिकून राहिली. आरक्षणाची भूमिका किंवा आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आहेत. त्यांनी बहुजन समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका स्वातंत्र्यापूर्वीच घेतली होती. त्यांनाही वंदन करण्यासारखा आजचा क्षण आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा समाजाने आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. काहींनी या मुद्द्यांवरून आत्महत्या केल्या. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, हे पाहण्याची आता आपली जबाबदारी आहे. मी आरक्षणासाठी सर्व जण एकत्र यावेत, म्हणून जनजागृतीची मोहीम राबवली होती. त्याला समाजातल्या सर्व घटकांनी प्रतिसाद दिला. आज त्याचे रूपांतर यशात झाले. 
-  संभाजीराजे छत्रपती, खासदार

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com