महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. केडीसीएच्या कार्यकारिणी मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली.

कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. केडीसीएच्या कार्यकारिणी मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली.

2019 ते 2022 या तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी एमसीएचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, केडीसीएचे माजी अध्यक्ष आर. ए. (बाळ) पाटणकर, माजी अध्यक्ष व सदस्य ऋतुराज इंगळे , पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे यशवंत भुजबळ, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत मते, सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे राजन नाईक, रत्नागीरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे किरण सामंत यांचे सहकार्य लाभले. 

दरम्यान  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 2019 ते 2022 या कालावधीसाठी अध्यक्षपदी विकास काकतकर, उपाध्यक्षपदी अजय गुप्ते, सेक्रेटरीपदी रियाज बागवान, खजानिसपदी सुरेंद्र भांडारकर, सेक्रेटरीपदी राहुल ढोले पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhajiraje Chhatrapati selected as member of Maharashtra Cricket association