खासदार मंडलिकांचे मेहुणे राजेश पाटील यांना आवतण

खासदार मंडलिकांचे मेहुणे राजेश पाटील यांना आवतण

चंदगड - काय ठरलं होत ते बाजूला ठेवा आणि आता शिवसेनेत प्रवेश करा, असे आपुलकीचे आणि प्रेमाचे आवतण खासदार संजय मंडलिक यांनी मेहुणे राजेश पाटील यांना दिले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
दाटे (ता. चंदगड) येथे शिवसेनेतर्फे खासदार प्रा. मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. जिल्हाप्रमुख विजय देवणे अध्यक्षस्थानी होते.

प्रारंभी उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, देवणे, कुपेकर, शिंत्रे यांच्या हस्ते प्रा. मंडलिक यांचा सत्कार झाला. शिवसेना आणि भाजपचे मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही पक्षांतील आमदारकीच्या दावेदारांनी चौफेर राजकीय टोलेबाजी करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

राजेश पाटील यांनी कसलेल्या शिवसैनिकाप्रमाणे भाषणाच्या सुरवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा नामोल्लेख केला आणि शिवसैनिकांना सुखद धक्का दिला. तोच संदर्भ पकडून मंडलिक यांनी त्यांना शिवधनुष्य हातात घेण्याचे आवाहन केले, तर संग्रामसिंह कुपेकर यांनी आम्ही तुम्हाला निवडून देण्याचे काम केले. आता आमच्या गळ्यात आमदारकीची माळ घालण्याची जबाबदारी तुमची, असे सांगून प्रेमाचा आग्रह केला. देवणे, खांडेकर, शिंत्रे, ॲड. संतोष मळवीकर यांची भाषणे झाली. प्राचार्य जे. बी. पाटील, अनिल दळवी, संज्योती मळवीकर, विद्यादेवी पाटील, श्‍वेता नाईक, अभय देसाई, तानाजी गडकरी, भरमाणा गावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सदानंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.  नामदेव पाटील यांनी आभार मानले.

चंदगडवर भाजपच्या हक्काचा दावा
कार्यक्रमात गोपाळराव पाटील यांनी ‘जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार तुमचे आहेत. राहिलेल्या चार जागा आम्ही घेणार.’’ असे वक्तव्य करून चंदगडवर भाजपचा हक्क सांगण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com