ताकारी-म्हैसाळ, टेंभूचे पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा - संजय पाटील

ताकारी-म्हैसाळ, टेंभूचे पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा - संजय पाटील

सांगली - ताकारी-म्हैसाळ आणि टेंभूचे जास्तीजास्त पंप सुरु करुन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचे आदेश कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी दिले. आज त्यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक वारणालीत घेतली.

अधिक्षक अभियंता हणमंत गुणाले, ए. एम. सिन्हा, एम. एस. जीवने, कार्यकारी अभियंता एम. एस. नलवडे, विजय पाटील, प्रशांत कडुस्कर, रेडीयार, पी. आर. पाटील उपस्थित होते. 

खासदार पाटील यांनी योजनेच्या कामांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी सांगितले कि, म्हैसाळ योजनेच्या कालव्याची काही ठिकाणी दुरुस्ती सुरु आहे. पंपांची दुरुस्तीही प्रलंबित आहे.

खासदार पाटील म्हणाले, पंपांच्या देखभालीतील अडचणींसंदर्भात मी मुंबईत पाठपुरावा करेन. अधिकाऱ्यांनी उपलब्ध पंपांच्या मदतीने प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी. विसापूर-पुणदीसह सर्व सिंचन योजनांचे जास्तीतजास्त पंप एकाचवेळी सुरु करावेत. यंदा पाऊस न झाल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागावर दुष्काळाचे सावट आहे. शेतकऱ्यांना सिंचन योजनांच्या पाण्याचाच दिलासा आहे. नव्या आवर्तनाला पैसे भरण्यासाठी शेतकरी निश्‍चित पुढे येतील. शेतकऱ्यांच्या वाट्याचे 19 टक्के पैसे घेऊनच पाणी द्यावे. थकबाकीमुळे योजना अडचणीत येऊ नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. जत, तासगाव, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्‍यात मागणी येईल तेथे प्राधान्याने पाणी द्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com