उदयनराजेंनी घेतली पालिकेच्या नवीन डंपरची 'टेस्ट राईड' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

सातारा पालिकेने स्वच्छतेसाठी दोन डंपर, दोन जेसीबी आणि एक ट्रॅक्‍टर अशी एकुण पाच वाहने खरेदी केली आहेत. याचे पूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत व आरोग्य सभापती यशोधन नारकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सातारा : सातारा पालिकेने नव्याने खरेदी केलेल्या डंपरची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी टेस्टराईड घेतली. चक्क खासदार उदयनराजे डंपर चालविताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. केवळ राजकारणच माहिर नाहीत तर वाहन चालविण्यातही साताऱ्याचे खासदार अव्वल असल्याचे यातून स्पष्ट झाले. 

सातारा पालिकेने स्वच्छतेसाठी दोन डंपर, दोन जेसीबी आणि एक ट्रॅक्‍टर अशी एकुण पाच वाहने खरेदी केली आहेत. याचे पूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत व आरोग्य सभापती यशोधन नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क डंपर चालविला. त्यांनी पालिकेचे वाहन दुरूस्ती केंद्रापासून डंपर घेऊन खासदार उदयनराजे राजवाडा येथील गोलबागेला फेरा मारून त्यांनी डंपर पुन्हा वाहन दुरूस्ती केंद्रातपर्यंत नेला.

यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे, नगरसेविका सविता फाळके, सौ. खुटाळे, सौ. पवार, श्रीकांत आंबेकर, पिंटू साळुंखे, सुहास राजे शिर्के, राजू भोसले, दत्तात्रेय बनकर, मनोज शेंडे, आदी उपस्थित होते. 

Web Title: MP Udyanraje Bhosale test ride in Satara