जो तुम्हारे दिल मे है, वो मेरे दिल मे नही...: उदयनराजे

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 10 मे 2018

खासदार-आमदार असा काही पेच निर्माण होत नाही. मी असलो की सगळे ठिक होते. उतारा काढायची वेळच येत नाहीत. त्या वेळी सगळेच सरळ असतात. त्या वेळी "कॉलर'सुद्धा सरळ असते, अशी मिश्‍कील टिप्पणी करत शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील खासदार-आमदारांतील पेचावर पडदा टाकला होता. एवढेच नाही तर पवार यांनी कॉलर उडवून दाखवून पुन्हा सरळ करूनही दाखविली. 

सातारा : राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी साताऱ्यात कॉलर सरळ करुन खासदार उदयनराजे भोसले यांची स्टाईल मारली तर खासदार उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई भेटीचे छायाचित्र सर्वत्र पोहचले. या दोन्ही घटनांची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खूमासदार चर्चा रंगली. या चर्चेतून कोणी काय अर्थ काढायचा तो काढा पण जो तुम्हारे दिल मे है, वो मेरे दिल मे नहीं...मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ राजधानी महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी होती..असे ट्विट आज (गुरुवार) खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. 

खासदार-आमदार असा काही पेच निर्माण होत नाही. मी असलो की सगळे ठिक होते. उतारा काढायची वेळच येत नाहीत. त्या वेळी सगळेच सरळ असतात. त्या वेळी "कॉलर'सुद्धा सरळ असते, अशी मिश्‍कील टिप्पणी करत शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील खासदार-आमदारांतील पेचावर पडदा टाकला होता. एवढेच नाही तर पवार यांनी कॉलर उडवून दाखवून पुन्हा सरळ करूनही दाखविली. 

खासदार उदयनराजे भोसले हे कॉलर उडविण्यात माहीर असले तरी ती कॉलर सरळ करण्यात आपण मास्टर असल्याचे खासदार पवारांनी बोलून दाखविले. 
याच दिवशी खासदार उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 25 ते 27 मे कालावधीत सातारा येथे होणाऱ्या राजधानी महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी मुंबईत गेले होते. त्याची छायाचित्र सर्वत्र पोहचली. ज्या ज्या वेळीस शरद पवार सातारा येथे आले. त्या त्या वेळीस खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. एकदा तर पवार साताऱ्याला निघाले असताना उदयनराजेंनी त्यांच्या वाहनाचे सारथ्य केले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 59 व्या पुण्यतिथी निमित्त शरद पवार साताऱ्यात आले. पण यावेळीस उदयनराजे साताऱ्यात नव्हते.

पवारांनी कॅमेऱ्यांच्या साक्षीने खासदारांच्या स्टाईलने कॉलर सरळ करुन पून्हा खाली घेतली. त्याची खूमासदार चर्चा दिवसभर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली. ही चर्चा थांबते ना थांबते तोवर पवार साहेब साताऱ्यात असताना उदयनराजे मुंबईत ते ही मुख्यमंत्र्यासमवेत याची चर्चा सुरु झाली. कोण काय चर्चा करतो यापेक्षा मला काय वाटते हे उदयनराजेंना सांगायचे होते की काय म्हणून आज सकाळी 11 वाजता त्यांनी टीव्ट केले आहे. त्यात ते म्हणतात जो तुम्हारे दिल मे है, वो मेरे दिल मे नही...मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ राजधानी महोत्सव चे निमंत्रण देण्यासाठी होती..

Web Title: MP Udyanraje Bhosale tweet about Sharad Pawar visit in Satara