कार्यकर्त्यांनी शहरी भागातील प्रश्‍नांवर आंदोलने करावीत 

कार्यकर्त्यांनी शहरी भागातील प्रश्‍नांवर आंदोलने करावीत 

कोल्हापूर - "राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरी भागाच्या प्रश्‍नावर आंदोलने केली पाहिजेत, शहरी लोकांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर या पक्षाचा विस्तार ग्रामीण भागाबरोबर शहरातही होईल,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रमुख खासदार वंदना चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले.

हॉटेल वृषाली येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. महापौर सरिता मोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

यावेळी खासदार चव्हाण म्हणाल्या,""राष्ट्रवादी पक्ष हा ग्रामीण भागामध्ये मजबूत आहे. आता तो शहरी भागातही मजबूत करायचा आहे. 2050 पर्यंत महाराष्ट्रातील शहरीकरण सुमारे 80 टक्‍क्‍यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शहरी भागातही मजबूत करायला हवा. त्यासाठी शहरातील पायाभूत सुविधा, रेशन व्यवस्था, वाहतूक, पब्लिक ट्रान्सपोर्ट या प्रश्‍नावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवायला हवा. विशेषतः पक्ष जे काम करेल, त्या कामाचे मार्केटिंगही करायला हवे.'' 

धनंजय महाडिक म्हणाले,""देशाचे नेते शरद पवार यांनी महागठबंधनाची बांधणी करुन सत्तारुढ भाजपाला शह देण्याचे मोठे काम केले आहे. देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. केंद्रात सत्तेवर असणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे शरद पवार यांचे केंद्रात हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही मला बहुमताने विजयी करावे'' 

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले,""शहरी भागात काम करणाऱ्या नगरसेवकांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात. त्याशिवाय ते निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारची कामे केली पाहिजेत.'' 

यावेळी आदिल फरास, अनिल साळोखे, सुरेश पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांचीही भाषणे झाली. यावेळी माजी महापौर हसिना फरास, नगरसेविका सूरमंजिरी लाटकर, नगरसेवक महेश सावंत, मुरलीधर जाधव, प्रा. जयंत पाटील, रमेश पोवार, प्रकाश काटे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com