विक्रीकर निरीक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

उपळाई बुद्रुक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विक्रीकर निरीक्षक पदांच्या 181 जागांसाठी जून 2017 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. यशस्वी विद्यार्थी लवकरच विक्रीकर निरीक्षक अधिकारी होणार या अशेने खूश झाले. परंतु सहा महिने उलटले तरीही यशस्वी विद्यार्थ्यांच्या नियुक्तीची कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. त्याचबरोबर आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची भरती प्रक्रियेची तयारी सुरू झाली असल्याने, डिसेंबरमध्ये विक्रीकर निरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Web Title: MPSC exam selection post