"महावितरण'ला थकबाकीचा शॉक 

तात्या लांडगे  
शनिवार, 2 जून 2018

सोलापूर - "महावितरण'कडे दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत असतानाच दुसरीकडे मात्र वाढत्या थकबाकीमुळे महावितरणलाच शॉक बसला आहे. राज्यातील घरगुती, शेती, औद्योगिक, पॉवरलूम, स्ट्रीट लाइटसह अन्य विभागांकडे तब्बल 40 हजार 144 कोटी रुपयांची थकबाकी आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढली आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे थकबाकी वसुलीत अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे थकबाकीदारांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याचे नियोजन आता "महावितरण'कडून सुरू असल्याची चर्चा आहे. 

- घरगुती विभागाच्या 32 लाख 84 हजार 258 ग्राहकांकडे 925 कोटी 84 लाख 
- वाणिज्य विभागाच्या 3 लाख 6 हजार 732 ग्राहकांकडे 376 कोटी 91 लाख 
- औद्योगिक विभागाच्या 65 हजार 297 ग्राहकांकडे 695 कोटी 61 लाख 
- 37 हजार 486 सूतगिरण्यांकडे 851 कोटी 32 लाख रुपये 
- 39 लाख 5 हजार 943 शेतकऱ्यांकडे 24 हजार 498 कोटी 43 लाख रुपये 
- 36 हजार 533 सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे 1 हजार 522 कोटी 18 लाख रुपये 
- 77 हजार 907 महापालिका व ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची 3 हजार 499 कोटी 71 लाख 
- कायमस्वरूपी वीज खंडित केलेल्या 37 लाख 55 हजार 922 ग्राहकांकडे 2 हजार 418 कोटी 15 लाख 
- अन्य 36 हजार 370 ग्राहकांकडे 55 कोटी 59 लाख रुपये 
- एकूण 40 हजार 144 कोटी 80 लाखांची थकबाकी आहे. 
("महावितरण'चे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. आर. पाटील यांनी दिलेली माहिती) 

आकडे बोलतात... 
एकूण थकबाकीदार  - 1,15,06,448 
मूळ थकबाकी  - 24,447 कोटी 
थकबाकीवरील दंड  - 15,697 कोटी 
एकूण थकबाकी  - 40,144 कोटी 

Web Title: MSEB has shock outstanding amount