शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे महावितरणचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

कॅनॉलचे आवर्तन सुटले आहे, परंतु श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावातील चारी क्रं.35 वरील डी. पी. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे, ऐनवेळी शेतीसाठी पाण्याची गरज असताना डी. पी. बंद पडली आहे.

श्रीगोंदा: कॅनॉलचे आवर्तन सुटले आहे, परंतु श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावातील चारी क्रं.35 वरील डी. पी. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे, ऐनवेळी शेतीसाठी पाण्याची गरज असताना डी. पी. बंद पडली आहे.

शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांजवळ वेळोवेळी तक्रार करूनही आधिकाऱ्यांद्वारे विविध प्रकारची करणे देऊन टाळाटाळ होत आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असताना सुद्धा शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वापरता येत नाही. कॅनॉलला वर्षांतून केवळ दोन ते तीन वेळा पाणी सुटते. त्यामुळे, यावेळेस डी. पी. बिघाडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

पाऊस कमी पडल्यामुळे शेती संपूर्णपणे कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे. टाकळी कडेवळीत गावच्या एका अधिकाऱ्याने डी. पी. शिल्लक नसल्याचे कारण दिऊन डी. पी. बसवण्यासाठी टाळाटाळ चालू आहे.

डी. पी. बरेच दिवस बंद आहे. अधिकाऱ्यांशी बोलले तर ते सांगतायेत डी. पी. शिल्लक नाही. त्यामुळे कॅनॉल ला पाणी आले असताना सुद्धा आमच्या मोटरी बंद आहेत. एकतर पाऊस नाही त्यात लाईट नसल्यामुळे मोठे नुकसान होत आहे- भाऊसाहेब वाळुंज, शेतकरी

Web Title: MSEDCL ignore to complaints of farmers