महाबळेश्वरचे पर्यटन झाले स्वस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

सातारा : महाबळेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवास कक्षांवर पावसाळी पर्यटन हंगामाकरिता विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत निवासी कक्षांचे दर जवळपास 30 टक्‍क्‍यांनी कमी केले आहेत. त्याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे व उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी केले आहे. 

पर्यटकांची संख्या महाबळेश्वरमध्ये वाढावी या उद्देशाने महामंडळाने पावसाळी पर्यटकांकरिता 30 सप्टेंबरपर्यंत निवासी कक्षांचे दर जवळपास 30 टक्‍क्‍यांनी कमी केले आहेत. शासकीय अधिकारी- कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांच्यासाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. महामंडळामार्फत पर्यटक निवासामध्ये प्रत्येक शनिवार व रविवार पर्यटकांच्या मनोरंजनाकरिता खेळाचे आयोजन केले जाते, तसेच प्रत्येक पौर्णिमेला स्थानिक कलाकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन केले जाते. महामंडळाच्या निवासी कक्षांचे आरक्षण ऑनलाइन पद्धतीने www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावरून होईल, तसेच महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातूनही व महामंडळाच्या ट्रॅव्हल एजंटद्वारेही निवासी कक्षांचे आरक्षण करता येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MTDC avails 30 % off for their resorts in mahableshwar