मुकुंदनगरमधील या गुंडाला लावला "एमपीडीए'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नगर : मुकुंदनगर येथील कुख्यात गुंड भुऱ्या ऊर्फ मुजीब अजीज खान (वय 30, रा. मुकुंदनगर, नगर) याला एमपीडीएअंतर्गत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल त्याला अटक करून कारागृहात रवानगी केली.

मुकुंदनगर परिसरात भुऱ्या खान यांची दहशत आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. त्यात मारहाण, खुनाचा प्रयत्न, जिवे मारण्याची धमकी, शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळूचोरांविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी भुऱ्या ऊर्फ मुजीब अजीज खान याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविला होता.

पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काल त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने तत्काळ सापळा लावून भुऱ्या खानला अटक केली. त्याला वर्षाकरिता नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध केले. यापुढेही रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukundanagar punk kicked off "MPDA"