विश्वास ठेवा हे सरकारी रुग्णालय आहे !

सुस्मिता वडतिले
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

- सर्वोपच्चार रुग्णालयात सुसज्ज "विसावा'
- रुग्णांच्या नातावाईकांना विश्रांतीसाठी स्वतंत्र कक्ष
- महिलांसाठी "हिरकणी' 

सोलापूर : सोलापूरातील सरकारी रुग्णालयातील सोयिसुविधा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना विश्रांती घेता यावी, यासाठी रुग्णालयातील बी ब्लॉकच्या समोर "विसावा' नावाने सुसज्ज कक्ष सुरु केला आहे. यामध्ये पिण्याचे पाणी, टीव्ही, सिसिटीव्ही, बसण्यासाठी बाकडे ठेवण्यात आले आहेत.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालयामध्ये जिल्ह्यासह शेजारील उस्मानाबाद व कर्नाटक, अंध्र प्रदेशातील रुग्ण येतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या येथे जास्त आहे. बाहेर गावातून आलेले रुग्ण ऍडमीट केल्यानंतर नातेवाईकांची गैरसोय होते. येथे धर्मशाळा आहे मात्र काहीवेळा त्यात जागा मिळत नाही. त्यामुळे नातेवाईकांना बाहेर बसावे लागते. हीच गरज ओळखून रुग्णालयातील बी ब्लॉकच्या समोर श्री विजयाभाई पटेल यांच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त पी. पी. पटेल फाऊंडेशनने सुसज्ज कक्ष साकरला आहे. यामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग आहे.

महिला विभागामध्ये स्तनदा महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष उभारला आहे. आतामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यववस्था केली आहे. सुरक्षेसाठी सिसिटव्हिी कॅमेरे बसवले आहेत. रुग्णांच्या नातावाईकांना प्रसन्न वाटावे म्हणून त्यात टीव्ही ठेवण्यात आला आहे. स्वच्छता आणि येथील व्यवस्था हे याचे वैशिष्ट्ये आहे. येथे 24 तास सुरक्षारक्षकाची नेमणुक केली आहे.

रुग्णालयात बाहेरगावाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्ण दाखल केल्यानंतर नातावाईकांना मुक्कामी थांबावे लागते. त्यांची गैरसोय पाहून येथे विसावा हा कक्ष सुरु केला आहे. रुग्णांच्या नातावाईकांनी याचा लाभ घेऊन स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. 
- डॉ. एस. बी. भोई, वैद्यकीय उपअधिक्षक, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालय

रुग्णाच्या नातेवाईकांना सुविधा मिळावी म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात "विसावा' नावाने कक्ष साकरला आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यात दोन टिव्ही ठेवण्यात आले आहेत. - जयश पटेल, विश्‍वस्त, 
पी. पी. फाऊंडेशन, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Multispeciality Government Hospital in Solapur