भरारी पथकांची होणार उलट तपासणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

सातारा - कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकाने नेमकी काय कारवाई केली, याची उलट तपासणी (क्रॉस चेकिंग) कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत होणार आहे. त्यासाठी संबंधित परीक्षा केंद्रातील ‘व्हिजिट बुक’चा आधार घेतला जाणार आहे. त्यातील नोंदीचा आधार घेत भरारी पथकांचे आता ‘ऑडिट’ होणार आहे. 

सध्या सुरू असलेल्या दहावी, तसेच बारावी परीक्षेला कॉपी पकडण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. कोल्हापूर विभागातून दहावीला एक लाख ४६ हजार, तर बारावीला एक लाख २९ हजार विद्यार्थी परीक्षेस सामोरे जात आहेत. तिन्ही जिल्ह्यांत भरारी पथके कार्यरत आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर, व्यवसाय मार्गदर्शन, डायटचे प्राचार्य, जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पथके तैनात आहेत. दोन्ही परीक्षांच्या निकालात गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’मुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली आहे. कॉपीचा प्रकार कोल्हापूर बोर्डाला काही नवा नाही. पूर्वी थेट खिडक्‍यांतून कॉपी टाकली जात होती. कॉपीसाठी प्रसिद्ध अशी काही केंद्रे होती. काळाच्या ओघात कॉपीच्या संकल्पनेत बदल झाला. शंभर टक्के निकालासाठी आड मार्गाने कॉपीचे प्रकार घडले. काही शाळांत थेट शिक्षकच उत्तर सांगत असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. 

राज्यातील नऊही विभागीय मंडळांत मुंबई बोर्ड वगळता भरारी पथकांना ॲडव्हान्स रक्कम देण्याची पद्धत आहे. मुंबईमध्ये भरारी पथकाने फिरती केल्यानंतर बिले दिली जातात. अन्य मंडळांत इंधन खर्च म्हणून प्रत्येक पथकाला १६ हजार इतकी रक्कम ॲडव्हान्स दिली जाते. 

दहावी, तसेच बारावीच्या परीक्षेला इतक्‍या मोठ्या संख्येने विद्यार्थी बसत असताना कुठेच कशी कॉपी होत नाही, असा प्रश्‍न शिक्षण क्षेत्रातील जाणकारांना पडला आहे. कॉपी खरंच होत नसेल तर ही बाब स्वागतार्ह आहे.

काही वर्षांपासून कॉपी कारवाईच्या संख्येत घट झाली आहे. दर वर्षी परीक्षेचा भाग आहे म्हणून भेट द्यायची, नंतर एक- दोन अशी कॉपी पकडली, की त्याचे रेकॉर्ड करायचे आणि मंडळाला सादर करायचे या पद्धतीने काम सुरू आहे. काही वरिष्ठ अधिकारी तर सदिच्छा भेट म्हणून केंद्राला भेट देतात. कार्यालयातून थांबून वर्गातही जाण्याची तसदी अधिकारी घेत नाहीत.

‘स्कॉड’चा दरारा झाला कमी 
पूर्वी ‘स्कॉड’ आले, की वर्गा वर्गात मोठी खळबळ उडायची. जे काही सोबत घेतले आहे ते खिडकीतून टाकून देण्याची लगबग उडायची. अर्थात संबंधित शिक्षकांकडून ‘स्कॉड’ आल्याची माहिती दिली जात होती. अलीकडे कॉपी प्रकरणानंतर त्यावर होणारी कारवाई होणाऱ्यांची संख्या पाहता कॉपीची प्रकरणे गांभीर्याने घेतली जात नसल्याचे स्पष्ट होते.

सातारा जिल्ह्यात मराठी विषयाच्या पेपरला बोगस (डमी) विद्यार्थी सापडला, तसेच बीजगणिताच्या पेपरमध्ये चार कॉपीबहादूर सापडले आहेत. कोणत्याही भरारी पथकाने एखाद्या केंद्रास भेट दिली, की त्याची नोंद ‘व्हिजिट बुक’मध्ये होते. त्याची एक प्रत मंडळाकडे सादर होते. त्याच प्रतीचा आधार घेत पथकाच्या कारवाईची उलट तपासणी होणार आहे.
- देविदास कुलाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी

Web Title: mumbai news satara news exam cheat scoud cheaking