आषाढी यात्रेवर मुंबई पोलिसांची नजर

भारत नागणे
गुरुवार, 12 जुलै 2018

दरवर्षी आषाढीवारीसाठी राज्याच्या विविध भागातून पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी येतात. अधिकारी व कर्मचारी आपली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडत असतात. यावर्षी प्रथमच मुंबई पोलिस आषाढीवारीसाठी येत आहेत. साधारण 25 पोलिस अधिकारी व 175 कर्मचारी येणार आहेत. मुंबई पोलिसांच्या कर्तव्याबद्दल आम्हाला ही अभिमान आहे.
- श्रीकांत पाडुळे, पोलिस निरीक्षक पंढरपूर

पंढरपूर : राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदीत आहेत. त्यामुळे यंदाच्या आषाढीवारीला किमान 10 लाख वारकरी उपस्थितीत राहतील असा पोलिस प्रशासनाचा आंदाज आहे.यात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच मुंबई पोलिसांना आषाढी यात्रेसाठी पाचारण करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांच्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते. मुंबई पोलिसांनी अनेक राष्ट्रीय आणि अांतरराष्ट्रीय गुन्हेगारांना जेरबंद करुन आपल्या कामाचा वेगळा ठसा उमठवला आहे.  आजही मुंबई पोलिसांच्या कामगिरी बद्दल देशभर चर्चा होते. मुंबई बाॅम्बस्फोट असो की जातीय दंगली या सारख्या घटनांमध्ये आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सुरक्षा अबाधित राखण्यार्या  मुंबई पोलिसांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात  आदराची भावना आजही कायम आहे.

नेहमीच देशाची आणि राज्याची डोळ्यात तेल घालून सुरक्षा कऱणारे मुंबई पोलिस यावेळी प्रथमच विठ्ठलाच्या सेवेसाठी पंढरपुरात येणार आहेत. या मध्ये 25 एपीआय, 175 पोलिस कर्मचारी सहभागी होणार आहेत.

दरवर्षी आषाढीवारीसाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी व अधिकारी पंढरपुरात येतात. वाळवंट, विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, चौफळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मठ या सारख्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा सलग तीन ते चार दिवस खडा पहारा देवून भाविकांची काळजी घेतात. वारी दरम्यान कोणताही अनुचित घटना व प्रसंग घडूनये यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस दक्ष असतात. यावेळी प्रथमच मुंबईचे पोलिस आषाढी वारीसाठी  पंढरीत येत असल्याने भाविकांमध्ये व पंढरपूरच्या नागरिकांमध्ये त्यांच्या विषयी उत्सुकता वाढली 

दरवर्षी आषाढीवारीसाठी राज्याच्या विविध भागातून पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी येतात. अधिकारी व कर्मचारी आपली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडत असतात. यावर्षी प्रथमच मुंबई पोलिस आषाढीवारीसाठी येत आहेत. साधारण 25 पोलिस अधिकारी व 175 कर्मचारी येणार आहेत. मुंबई पोलिसांच्या कर्तव्याबद्दल आम्हाला ही अभिमान आहे.
- श्रीकांत पाडुळे, पोलिस निरीक्षक पंढरपूर

Web Title: Mumbai police watch Pandharpur Ashadhi Yatra