esakal | महापालिकेचा लिपीक  लाचलुचपतच्या जाळ्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

Mahapalika.jpg

सांगली ः जन्म दाखल्यात दुरूस्ती करून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या कनिष्ठ लिपीकास रंगेहात पकडण्यात आले. राम दगडू शिकलगार (वय 45, भारतनगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

महापालिकेचा लिपीक  लाचलुचपतच्या जाळ्यात 

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली ः जन्म दाखल्यात दुरूस्ती करून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या कनिष्ठ लिपीकास रंगेहात पकडण्यात आले. राम दगडू शिकलगार (वय 45, भारतनगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

तक्रारदारांनी मुलाच्या जन्म दाखल्यावरील दुरूस्तीसाठी जन्म व मृत्यू विभागात अर्ज केला होता. शिकलगारने पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. शिकलगारने पाचशे रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

लाच लुचपतचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, अविनाश सागर, सुहेल मुल्ला, रवींद्र धुमाळ, संजय संकपाळ, भास्कर भोरे, प्रतीम चौगुले, धनंजय खाडे, राधिका माने, सीमा माने, बाळासाहेब पवार यांचा कारवाईत सहभाग आहे. 

तक्रारीसाठी टोल-फ्री 
शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्यावी. त्यासाठी 1064 हा टोल फ्री क्रमांक आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे निरीक्षक मोरे यांनी सांगितले. 

संपादन ः अमोल गुरव 

loading image
go to top