महापालिका आयुक्तांच्या गाडीला अपघात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

नगर : महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे मुंबईहून नगरला येत असताना त्यांचा गाडीला शिरूर जवळ अपघात आला. यात गाडीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आयुक्तांना कोणतीही इजा झाली नाही.

नगर : महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे मुंबईहून नगरला येत असताना त्यांचा गाडीला शिरूर जवळ अपघात आला. यात गाडीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आयुक्तांना कोणतीही इजा झाली नाही.

भालसिंग हे काल महापालिकेच्या कामासाठी मंत्रालयात गेले होते. तेथील काम आटोपून सायंकाळी कारने ते नगरच्या दिशेने निघाले. नगर-पुणे महामार्गावर शिरूरजवळ रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या कारला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले. परंतु, आयुक्तांना इजा झाली नाही, ते बचावले. 

तसेच चालकालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर कार दुरूस्तीसाठी नेण्यात आली, तर आयुक्त भालसिंग यांना दुसऱ्या वाहनाने नगरला आणण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner's car accident

टॅग्स