सोलापुरात शांततेत मतदान सुरू 

शीतलकुमार कांबळे
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी 8 वाजता मतदान केले. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी लिटल फ्लॉवर स्कूल येथे सकाळी 7:45 वाजता तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सकाळी 9:30 वाजता मतदानाचा हक्क बजावला.

सोलापूर - शहरात मतदान शांततेत सुरू आहे. सकाळी साडेअकरापर्यंत 17 टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

सर्वच मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची लगबग दिसून आली. पोलिंग एजंट उन्हात बसूनही आपली भूमिका बजावत आहेत. सकाळी शहरातील काही केंद्रावर मतदारांचे स्वागत करण्यात आले. तर काही केंद्रावर रांगोळी काढून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. दुपारी उन्हामुळे मतदान केंद्रावर गर्दी कमी दिसून आली. शहराच्या मुख्य बाजारपेठा ग्राहक नसल्याचे दिसून आले. बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्याचे चित्र होते.

माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी 8 वाजता मतदान केले. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी लिटल फ्लॉवर स्कूल येथे सकाळी 7:45 वाजता तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सकाळी 9:30 वाजता मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: municipal corporation election in solapur