प्लास्टिक पिशवी वापरल्यास महापालिका कर्मचाऱ्यांस होणार पाच हजारांचा दंड 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सोलापूर - कामावर असताना प्लास्टिक कॅरिबॅग हाताळणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यास पाच हजार रुपयांचा दंड होणार आहे. ही रक्कम त्याच्या पगारातून कपात केली जाणार आहे. 

महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, सर्व विभागीय अधिकारी कार्यालये व इतर कार्यालयांच्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारीच प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर व हाताळणी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जे कर्मचारी प्रतिबंधित प्लास्टिक व नॉनवोवन प्रकारच्या कॅरिबॅगचा वापर कार्यालयात करीत असल्याचे आढळल्यास त्यास संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. रक्कम न भरल्यास त्याच्या पगारातून ती कपात केली जाणार आहे. 

महापालिकेत येणाऱ्या नागरिकांकडे अशा प्रतिबंधित कॅरिबॅग आढळल्यास त्यांच्याकडून ती जप्त करण्यात येणार असून, सक्त ताकीद दिली जाणार आहे. पुन्हा कॅरिबॅग आढळल्यास दंड करणार असल्याची माहिती त्याला दिली जाणार आहे. या आदेशामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

प्लास्टिक बंदी अधिनियमातील तरतुदीनुसार ही कारवाई होईल. दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळले तर दहा हजार रुपयांचा दंड होणार आहे.

Web Title: municipal corporation employees will be fined five thousand for using plastic bags