कत्तलखाना बंदचा अधिकार महापालिकांना 

कत्तलखाना बंदचा अधिकार महापालिकांना 

सोलापूर -  सरकारने निश्‍चित केलेल्या दिवशी कत्तलखाना बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिकांना देण्यात आले आहेत. यापूर्वी सरकार या संदर्भातील आदेश जारी करीत होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश राज्यातील सर्व महापालिकांना पाठविण्यात आला आहे. 

निरनिराळ्या सणांच्या दिवशी कत्तलखान्यात जनावरांच्या कत्तली बंद ठेवण्याबाबत विश्‍व हिंदू परिषद, मलकापूर येथील नागरिक समितीने सरकारकडे निवेदने दिली होती. सध्या राज्यामध्ये स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, रामनवमी, महावीर जयंती, गांधी जयंती, संवत्सरी, साधू वासवानी यांची जयंती या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्यात येतात. त्यानुसार कार्यवाही सध्या करण्यात येते. बॉम्बे मटण डीलर असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र सरकार या दाव्यात उच्च न्यायालयाने आदेश जारी केला असून, कत्तलखाने बंद ठेवण्याच्या दिवशी मांसाहारी जनतेची गैरसोय होणार नाही आणि शाकाहारी जनतेचाही आदर राखला जाईल, अशा पद्धतीने धोरण राबविण्याचा आदेश दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com