नगर - श्रीपाद छिंदम येणार असल्याने महापालिकेला छावणीचे स्वरुप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नगर - माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आज महापालिकेत सभेसाठी येणार असल्याने तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेला आज छावणीचे स्वरूप आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याबद्दल मध्यंतरी छिंदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांच्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर वातावरण शांत झाले. पण आता तो राजीनामा मी दिलेलाच नाही, त्यावरील सही माझी नाही, असे सांगत त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.

या पार्श्वभूमीवर आज त्यांचे महासभेला येणे महत्त्वाचे मानले जाते. काल त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागीतले. तसेच प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची काल त्यांनी भेट घेऊन सभेला येणार असल्याचे सांगितले. त्यांनीही पोलिसांना सूचना देऊन छिंदम यांना पूर्ण संरक्षण देण्यास सांगितले. त्या अनुषंगाने आज महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक पहारा असून, महापालिकेला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Web Title: Municipal Corporation turn in to the like camp