भाजप-सेना युतीचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

सांगली - काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे स्पष्ट संकेत दिसताच आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या युतीचेही वारे वाहू लागले आहे.  काही दिवसांपूर्वी आमदार सुधीर गाडगीळ यांनी शिवसेनेशी युतीची चर्चा होऊ शकते असे सांगून ती शक्‍यता व्यक्त केली होती. आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर युतीबाबत गंभीरपणे चर्चा सुरू झाली आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यात युती जोमात असतानाही सांगली महापालिका निवडणुकीसाठी कधी युतीचे सूर जुळले नव्हते. अगदी राष्ट्रवादीचे नेते जंयत पाटील यांनी काँग्रेसविरोधात महाआघाडीचा प्रयोग केला तेव्हा शिवसेना वगळून सारे पक्ष या आघाडीत होते. 

अर्थातच आजवरच्या इतिहासात शिवेसेनेच्या चिन्हावर  महापालिकेत कधी काळी अरुण मोरे, स्वाती शिंदे अशी काही मंडळी होती. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. माजी आमदार संभाजी पवार यांनी भाजप  त्याग केला आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव शिवसेनेत  दाखल झाले आहेत.

काँग्रेसमधून शेखर माने, दिगंबर जाधव अशी मंडळी आता शिवसेनेत दाखल झाली  आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते शिवसेनेला महापालिका क्षेत्रात चिन्हावर लढता येईल असं बाळसं शिवसेना धरत आहे. त्यामुळे पक्षासाठी आजवर ओसाड माळरान ठरलेल्या सांगलीत राज्य पातळीवरील अनिल देसाई, गजानन कीर्तीकर, सुभाष देसाई अशी नेतेमंडळी येताना दिसत आहेत.  

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर जिंकून येणाऱ्या जागांचे  समीकरण जुळवण्यासाठी शिवसेनेला मित्र पक्षाची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे. मित्र म्हणून भाजपशी युतीच फायद्याची ठरू शकते असा मतप्रवाह आहे. तेच भाजपचेही झाले आहे. महापालिका जिंकण्याच्या वारंवार गर्जना करणाऱ्या नेत्यांना भाजप स्वबळावर पूर्ण बहुमतापर्यंत जाऊ शकेल याची खात्री वाटत नाही. 

शिवसेनेने टोकाचा विरोध केला तर अनेक प्रभागात  गणित विस्कटेल अशी भीती भाजप नेत्यांना आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांनी आघाडीचे स्पष्ट संकेत दिल्याने दोन्ही युती पक्षांची गरज आणखी वाढली आहे. सांगलीत वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्ताने आलेल्या मुंबईतील वरिष्ठ सेना नेत्यांनी स्थानिकांशी चर्चा करून बांधलेले अंदाजही युतीच्या बाजूने आहेत.  त्यामुळे युतीची चर्चा करायचीच झाली तर कोणते प्रभाग असावेत याची चाचपणी सेना वर्तुळातून सुरू झाली आहे.

Web Title: Municipal Election BJP Shivsena Yuti Politics