सांगलीत मुलाखतींचा सुपर संडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

सांगली - पालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. रविवारच्या सुटीचा योग साधून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीच्या मैदानात धुरळा उठवला आहे. कोणी वाजंत्री, दुचाकी रॅली, तर कोण पारंपरिक पद्धतीने शक्तिप्रदर्शन करत उमेदवारीसाठी दावा करत होते. तिन्ही पक्षांतून साडेचारशे इच्छुकांनी उमेदवारी मागितली. महापालिकेसाठी १ ऑगस्टला मतदान होणार आहे. आज सकाळपासून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. ‘किस में कितना है दम’ यावेळी दाखवण्यात आला. माझी उमेदवारी का? हे सांगत उमेदवारीसाठी ठणकावून दावा केला.

‘भाजप’त १५० इच्छुक
पालिका मैदानात ताकदीने उतरलेल्या भाजपने आज सांगली परिसरातील दहा प्रभागांतील १५० इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. टिपिकल भाजप अन्‌ नवा भाजप असे दोन्ही प्रकार पाहायला मिळाले. दुचाकी रॅली, ढोल-ताशे, तरुणाईचा उत्साहही दिसून आला. सायंकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरू राहिल्या. प्रत्येक उमेदवाराने शक्तिप्रदर्शन केले. उर्वरित दहा प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी (ता. २) मिरजेत होणार आहेत.

‘राष्ट्रवादी’त २०० 
राष्ट्रवादीच्या सुमारे २०० इच्छुकांनी आज मुलाखती दिल्या. वाजंत्री, ढोल-ताशाचा निनाद आणि पारंपरिक पद्धती असे कॉम्बिनेशन इथे दिसून आले. सकाळपासून सायंकाळपर्यंत जल्लोषी वातावरण होते.

‘काँग्रेस’मध्ये १०० 
काँग्रेस पक्षातर्फे दोन दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. काल सांगलीतील मुलाखतींसाठी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आज मिरजेतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आज मिरजेत १०० उमेदवारांच्या मुलाखती झाल्या, तर दोन दिवसांत ३२५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

Web Title: Municipal Election Interview Congress BJP NCP Politics