भाजपच्या थापांना बळी पडू नका - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

सांगली - महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतदारांच्या अपेक्षा जाणून घेऊन आघाडी  केली आहे. या तिन्ही शहरांचा विकास उत्तम करण्याचे काम आम्ही करू. आपल्या समोरचे आव्हान आताच संपवले पाहिजे. मताचा नाही तर नोटांचा परिणाम होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आले  आहेत, भाजपच्या थाप्पांना बळी पडू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या प्रभाग एकमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंचशीलनगरमध्ये दसरा चौकात आयोजित सभेत आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्री पाटील, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले,‘‘आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या सत्ताकाळात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला कधीही निधी कमी पडू दिला नाही. परंतु गेल्या चार वर्षांच्या काळात राज्यातील भाजप सरकारने  महापालिकेला कोणत्याही प्रकारचा भरीव निधी दिला  नाही. आज शहराच्या विकासाच्या बाता करणारे  निवडणूक प्रचार काळात शेवटच्या दिवसापर्यंत लोकांना खोटे आश्वासित करीत गल्लीबोळात तोंडाला येईल ते बोलत आश्वासनांची खैरात हे लोक करतील. ते जेवढे बोलतात त्याच्या ५-१०टक्‍के सुद्धा काम करत नाहीत.’’

‘बंडखोरांना माझ्या दारात थारा नाही’
मिरजेतील सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, ‘स्वार्थासाठी बंडखोरी करणाऱ्यांना माझ्या स्वत:च्या दारात पुन्हा उभे करणार नाही किंबहुना राष्ट्रवादी पक्ष अशा स्वार्थी मंडळींना माफ करणार नाही, असा सज्जड इशारा दिला. शहरातील राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले,‘‘गेल्या काही वर्षांपासून राजकीय सत्तेपासून आर्थिक लाभ उठविण्याच्या प्रवृत्तींमध्ये वाढ झाली आहे. अशांना जागीच ठेचण्याची तयारी मतदारांनी करावी. मतदारांना गृहीत धरून स्वत:चा स्वार्थ  साधण्याची प्रवृत्ती राजकीय पक्षांनाही घातक ठरते आहे. मतदार राजा ही संकल्पना आता मोडीत निघाली असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना मिळणारे महत्त्व ही मतदारांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असल्याचेही त्यांनी सांगितले.’’

Web Title: municipal election Jayant Patil NCP BJP Politics