इतर ‘वर्गीयांचा’ ‘ओपन’मध्‍येही शड्डू!

जयसिंग कुंभार
मंगळवार, 24 जुलै 2018

सांगली - सर्वसाधारण पुरुष आणि सर्वसाधारण महिला जागांवर अन्य आरक्षित प्रवर्गातील ५४ पुरुष  आणि ४६ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. यातले किती विजयी होतात हा भाग वेगळा; मात्र त्यांनी तिथे शड्डू ठोकण्याचे धाडस दाखवले आहे, हे बदलत्या सामाजिक अभिसरणाचे द्योतक मानता येईल. कायद्याप्रमाणे खुल्या जागा या खुल्याच असतात. त्यावर कोणीही उभे राहू शकतो म्हणूनच त्या खुल्या असतात, मात्र ही आकडेवारी एकूणच बदलत्या वर्तमानाचे काही आडाखे बांधणारी आहे हे नक्की.

महापालिकेच्या वीस प्रभागांतून एकूण ७८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यापैकी सर्वसाधारण (खुल्या) २४ जागा आहेत. या जागांवर कोणीही पुरुष अथवा महिला उभी राहू शकते. त्या सर्वार्थाने खुल्याच आहेत. २१ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत. या जागेवरही कोणत्याही प्रवर्गातील महिला उभी राहू शकते. भारतीय राज्यघटनेत वंचित आणि दुर्बल घटकातील जात समूहांना लोकप्रतिधित्वाची संधी मिळावी या हेतूने आरक्षणाचा सामवेश झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदा ३३ आणि नंतर ५० टक्के इतके महिलांना समान आरक्षण देण्यात आले. अर्थात हे आरक्षण समांतर  म्हणजे सर्व जाती समूहांना लागू आहे. एकूण सभागृहात महिलांचे प्रमाण किमान पन्नास टक्के इतके राहिले पाहिजे हा हेतू. ते अधिक असू शकते.

अनुसूचित जाती आरक्षित जाती जागेवर काँग्रेसच्या विद्यमान उमेदवार शेवंता वाघमारे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यातून हेच सिद्ध होते. 
खुल्या प्रवर्गातील जागांवर प्रामुख्याने समाजातील उच्च जातीसमूहातील, आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार लढत असतात. त्यामुळे या जागांवरील लढती प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या होत असतात. मात्र महापालिका क्षेत्रात दाखल ४५१ उमेदवारांपैकी तब्बल १०० उमेदवारांनी खुल्या जागांवर उमेदवारी दाखल करीत आम्हीही कमी नाही हे दाखवून दिले आहे. अर्थात प्रत्यक्ष निवडणुकीच्या समीकरणात ते किती मते घेतील, विजयापर्यंत किती जातील हे पाहणी रंजक असेल.

प्रभागनिहाय सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण जागेवर 
अन्य प्रवर्गातील उभ्या उमेदवारांची संख्या 

प्रभाग १ - महिला - १ पुरुष- १ , २ - ०- ४, ३ - ४ - ५, ४ - १-१, ५ - ६-५, ६ - २-५, ७ - ३-५, ८ - ०-२, ९ - २-१, १० - ६-७, ११ - ०-२, १२ - १०-०, १४ - १-०, १५ - १-१, १६ - ५-०, १७ - १-५, १८ - ०-३, १९ - ०-७, २० - ३-०

Web Title: Municipal Election reserve seat OBC class Open class politics