झोपडपट्टीवाले रांगेत, सदनिकावाले निवांत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

उन्हाचा परिणाम - शेळगी, दहिटणे, भवानी पेठेत शांततेत मतदान 

प्रभाग क्रमांक - १, २, ३, ४ मधील चित्र

झोपडपट्टीतील मतदारांनी सकाळपासून उत्साहाने रांगा लावल्या अन्‌ सोसायटीत राहणाऱ्या अनेकांना मतदानासाठी आग्रह करावा लागला, असे चित्र प्रभाग एक ते चारमध्ये पाहण्यास मिळाले. भवानी पेठ, शेळगी, हिप्परगा रोड, सम्राट चौक, दयानंद कॉलेज, दहिटणे, मंगळवार पेठ, तुळजापूर वेस, बाळीवेस या परिसरातील ४४ इमारतींमधील १४२ मतदान केंद्रातून शांततेत मतदान झाले. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची व संशयकल्लोळ वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान पार पडले.  

सकाळी मतदानाचा वेग कमीच होता. नऊनंतर रांगा वाढल्या. गर्दी वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती, मात्र उन्हाचा तडाखा त्यात आड येत होता. सूर्य नारायण माथ्यावर येऊन आग ओकू लागला तेव्हा मतदानाच्या रांगा कमी झाल्या. सायंकाळ होताच पुन्हा मतदारांची गर्दी वाढली. सायंकाळी दयानंद महाविद्यालसमोरील मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून गर्दी जमा होऊन हुल्लडबाजी झाली. पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज करून परिस्थिती आटोक्‍यात आणली. 

मोठ-मोठ्या सोसायटींतील मतदारांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांना खटकत होती. त्यांना बाहेर काढण्याची धडपड सुरू होती. झोपडपट्टी भागातून मोठ्या रांगा दिसून येत होत्या. झोपडपट्टीवासीयांमध्ये उत्साह अधिक होता. शेळगीतील जिल्हा परिषद शाळा, एस. के. बिराजदार विद्यालय, महात्मा जोतिराव फुले विद्यालय, मातोश्री रत्नमाला मराठी विद्यालय, हैदराबाद रस्त्यावरील पशुवैद्यकीय दवाखाना, भवानी पेठेतील सिद्धेश्‍वर बालक मंदिर, निर्मल विद्या मंदिर, भूदेवीबाई बालक मंदिर, भारत विद्यालय, सहस्रार्जुन प्रशाला, जलशुद्धीकरण केंद्र, सम्राट चौकातील चंडक हायस्कूल, एसईएस पॉलिटेक्‍निक, दहिटणे येथील जि. प. शाळा, साई समर्थ विद्या मंदिर, शंकरलाल मेहता प्राथमिक शाळा, साईबाबा प्रशाला यांसह दयानंद कॉलेजसमोरील दयानंद मॉडेल स्कूल, डी. के. आसावा हायस्कूल आदी मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले.

मशिनमध्‍ये बिघाडाचा संशय 
प्रभाग चारमधील भवानी पेठेतील सिद्धेश्‍वर बालक मंदिर येथील बूथवरील एका अपक्ष उमेदवाराच्या नावासमोरील बटण प्रेस होत नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. चौकशीनंतर तसे काही नसून गैरसमज निर्माण झाल्याचे  लक्षात आले.

Web Title: municipal election solapur