चुरशीच्या मतदानाला पैसे वाटपाचे गालबोट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

प्रभाग १२ मध्ये नगरसेविका शशीकला बत्तुल, जगदेवी नवले, अस्मिता गायकवाड, संजीवनी कुलकर्णी, अनिल पल्ली, सिद्धेश्‍वर कमटम, विनायक कोंड्याल हे दिग्गज रिंगणात आहेत. या प्रभागाच्या चारही जागांसाठी सकाळी अतिशय चुरशीने आणि दुपारी संथगतीने मतदान झाले. चार मतदानांची पुरेशी माहिती न मिळाल्याने अनेक केंद्रांवर मतदारांचा गोंधळ उडाला. 

प्रभाग १३ मध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वस्ती आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पत्नी कामिनी आडम यांच्यासह भाजप पुरस्कृत सरिता वडनाल रिंगणात असलेल्या या प्रभागात चुरशीने मतदान झाले.

प्रभाग १२ मध्ये नगरसेविका शशीकला बत्तुल, जगदेवी नवले, अस्मिता गायकवाड, संजीवनी कुलकर्णी, अनिल पल्ली, सिद्धेश्‍वर कमटम, विनायक कोंड्याल हे दिग्गज रिंगणात आहेत. या प्रभागाच्या चारही जागांसाठी सकाळी अतिशय चुरशीने आणि दुपारी संथगतीने मतदान झाले. चार मतदानांची पुरेशी माहिती न मिळाल्याने अनेक केंद्रांवर मतदारांचा गोंधळ उडाला. 

प्रभाग १३ मध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वस्ती आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पत्नी कामिनी आडम यांच्यासह भाजप पुरस्कृत सरिता वडनाल रिंगणात असलेल्या या प्रभागात चुरशीने मतदान झाले.

दुपारच्या वेळी काँग्रेस आणि माकपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा संशय एकमेकांवर करण्यात आल्याने गोंधळ झाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. माकपचे उमेदवार मुरलीधर सुंचू यांच्याशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. हे प्रकार वगळता एकूणच प्रभागात शांततेत मतदान झाले. प्रभाग १४ मध्ये अनेक मतदान केंद्रांवर तणावपूर्ण वातावरण होते. रस्त्याच्या मधोमध बॅरीगेटस्‌ लावण्यात आले होते. किडवाई चौक, मुस्लिम पाच्छा पेठ, बेगम पेठ परिसरातील केंद्रावरही चुरशीने मतदान झाले. या प्रभागातून रफीक हत्तुरे, पीरअहमद शेख, मकबूल मोहोळकर, खैरून्निसा शेख, वहिदाबानो शेख, अजय देशपांडे, उपेंद्र दासरे, महिबूब हिरापुरे रिंगणात आहेत. एकूणच या प्रभागातील काही ठिकाणी चुरशीच्या मतदानाला पैसे वाटपाचे गालबोट लागल्याचे चित्र दिसून आले.

मतदान पाहणीसाठी दिग्गजांनी लावली पायाला भिंगरी

प्रभाग - ९, १०, ११ मधील चित्र

उपमहापौर प्रवीण डोंगरे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे, नगरसेवक नागेश वल्याळ, नगरसेविका गीता मामड्याल, नगरसेवक दत्तू बंदपट्टे, नगरसेवक मेघनाथ येमूल, माजी आमदार कन्या अरुणा आडम अशा दिग्गजांनी आज मतदानाची पाहणी करण्यासाठी पायाला अक्षरशः भिंगरी लावली होती. सकाळी सातपासून सुरू झालेली भटकंती सायंकाळी सहा वाजता थांबली. दिवसभर चोहीकडे फिरून देखील मतदानाचा वाढत नसलेला टक्का सर्वांना सतावत होता. 

गेल्या ११ दिवसांपासून प्रचाराच्या निमित्ताने गल्लोगल्ली फिरल्याने नेत्यांच्या चेहऱ्यांवर शिणवटा प्रकर्षाने जाणवत होता. चार वॉर्डांच्या मिळून झालेल्या प्रभागामुळे नेत्यांची यंदाच्या निवडणुकीत पुरती दमछाक झाली. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढेल, अशी आशा सर्वांना होती. परंतु शेवटपर्यंत मतदानाचा टक्का किरकोळच वाढल्याने मतदान झाल्यानंतरही निकाल काय लागेल, याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकत नव्हता.

उपमहापौर डोंगरे यांनी प्रभाग नऊमध्ये सकाळी सर्वांत प्रथम मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह प्रभागातील ३७ मतदार केंद्रांची पाहणी केली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी आज सकाळी प्रभाग ११ मध्ये मतदान केले. विडी घरकुल भागात स्वत: पाहणी केली. याशिवाय शहरातील प्रभाग एक, दोन, तीन, चार, १२, १३, २०, २२, २४ या प्रभागांत जाऊन पाहणी केली. नगरसेविका व उमेदवार कुमुद अंकाराम यांनी स्वतः प्रभाग ११ मधील विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे विद्यालयाच्यासमोर तळ ठोकला होता. क्षणाक्षणाची त्या बित्तंबातमी घेत होत्या. सरवदेनगर येथील आदर उर्दू शाळेत मतदारांसाठी खास मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रभाग १० मधील रंगराजनगर येथील सुशीलकुमार शिंदे, उर्दू प्राथमिक शाळेत दुपारनंतर मतदारांनी मतदानासाठी लगबग केली होती. 

नावे शोधण्यात दमछाक
प्रभाग नऊ, १०, ११ या प्रभागांत कामगारांची संख्या मोठी आहे. सोलापूर महापालिकेच्या प्रभागरचनेत अनेक मतदारांची नावे गायब झाली आहेत. ही नावे शोधण्यात व नावे शोधल्यानंतर पहिल्यांदाच चार मतदान करावे लागणार असल्याने या प्रभागांतील मतदारांमध्ये गोंधळ उडाला. या सर्व प्रक्रियेत कार्यकर्ता अन्‌ मतदारांची दमछाक झाली होती.

Web Title: municipal election solapur