महापालिका निवडणुकीसाठीचा मीडिया कक्ष नावालाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सोलापूर - निवडणूक प्रक्रियेबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींना वेळेत आणि अचूक माहिती मिळावी या हेतूने आयुक्तांनी अत्याधुनिक सुविधांनीयुक्त मीडिया कक्षाची सुविधा केली. मात्र हा कक्ष केवळ नावापुरताच असल्याचे स्पष्ट झाल्याने माहिती मिळवण्यासाठी पत्रकारांना प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. 

निवडणुकीची प्रक्रिया २७ जानेवारीपासून सुरू झाली. २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत एकदाही अचूक माहिती या कार्यालयाकडून वेळेत उपलब्ध झाली नाही. प्रत्येक वेळी हेलपाटे मारावे लागले. मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्तांच्या पत्रकार परिषदे वेळीही यादी उपलब्ध नव्हती, त्या वेळी त्यांनी निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवून यादी मागवून घेतली. तोपर्यंत रात्रीचे आठ वाजून गेले होते. 

नॉर्थकोट प्रशालेतील मीडिया कक्षात सकाळच्या सत्रात दोन किंवा तीन चतुर्थश्रेणी कर्मचारी असतात. वेगवेगळ्या दैनिकांत निवडणूक संदर्भात आलेल्या बातम्यांची कात्रणे करणे आणि ते चिकटवणे ही त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात व ते निघून जातात. मात्र एकूणच माहिती ज्यांना एकत्रित करायची आहे व ती माध्यमांपर्यंत पोचवायची आहे, ते कर्मचारी मात्र इकडे-तिकडे फिरत असतात. दुपारी माध्यमांचे प्रतिनिधी आल्यावर त्यांना ‘कर्तव्या’ची जाणीव होते आणि तेथून याद्या गोळा करणे किंवा तत्सम कामे सुरू होतात. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ‘अधिकृत’ माहिती घेण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतीक्षा करावी लागत आहे. 

यांनी केली धडपड...
माध्यमांच्या प्रतिनिधींना वेळेत अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक कार्यालयातील युवराज गाडेकर, गोपाळ जोशी, जगदीश व्होरगीनमठ, शिव उदगिरी, रवी उपळाईकर, नागेश कोंगारी, प्रकाश भोसले, वासू म्हेत्रे, भाग्यश्री जगताप-ताड आणि गणेश डेंगळे यांनी धडपड केली.

Web Title: municipal elections media room