महापालिका- नगरपरिषद गाळ्यांचा  "ई-लिलाव' 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 30 मे 2018

सोलापूर - महापालिका व नगरपरिषदांच्या जागांचा व्यवहार करताना ई लिलाव किंवा ई निविदा प्रक्रियेचा अवलंब करावा, असे संयुक्त धोरण शासनाने निश्‍चित केले आहे. या संदर्भातील आदेश जारी झाला आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या सोलापूर महापालिका गाळे लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

सोलापूर - महापालिका व नगरपरिषदांच्या जागांचा व्यवहार करताना ई लिलाव किंवा ई निविदा प्रक्रियेचा अवलंब करावा, असे संयुक्त धोरण शासनाने निश्‍चित केले आहे. या संदर्भातील आदेश जारी झाला आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या सोलापूर महापालिका गाळे लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

लोकलेखा समितीने महाराष्ट्र विधानसभेच्या आठव्या अहवालात शिफारसी केल्या आहेत. त्यामध्ये या संदर्भातील कार्यवाहीचा समावेश आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या मालकीच्या जमिनी भाडे तत्त्वावर देताना, कायम स्वरुपी देताना तसेच संबंधित जमिनींचा विकास करताना करावयाची कार्यपद्धती निश्‍चित केली आहे. ज्या प्रकरणामध्ये शासनाच्या मान्यतेची आवश्‍यकता आहे, त्या प्रकरणी शासनाची मान्यता घ्यावी, असेही या संदर्भातील आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांची मालमत्ता भाडे तत्वावर किंवा कायमस्वरुपी देताना ई-निविदा किंवा ई लिलाव प्रक्रिया करावी, अधिनियमातील तरतुदीनुसार भाडेपट्ट्याने जमिनी देताना, कायमस्वरुपी देताना त्यासाठी घेण्यात येणारी रक्कम ही बाजारमूल्यापेक्षा कमी असता कामा नये, ज्यासाठी जमिन आरक्षित आहे त्यानुसारच तेथे काम होईल याची दक्षता घ्यावी, जागा देण्याच्या संबधीचा करार करताना महापालिका, नगरपरिषदांचे हित पूर्णपणे जोपासले जाईल याची दक्षता घ्यावी, नगरपरिषदा व नगर पंचायतीसंदर्भात स्थावर मालमत्ता हस्तांतरण करण्यापूर्वी करारनाम्याच्या प्रारुपास आयुक्त तथा संचालक, नगर परिषद संचालनालय यांच्याकडून मान्यता घेणे आवश्‍यक आहे, या संदर्भातील अटी व शर्थींचा भंग झाल्यास संबंधित जागा तत्काळ प्रशासनाकडून ताब्यात घेतली जाणार आहे. 

आयुक्त, मुख्याधिकारी जबाबदार 
शासनाने निश्‍चित केलेल्य मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करून करार केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका आयुक्त आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर टाकण्यात आली आहे.

Web Title: municipal nagarparishad shops e-auction