पालिका पदाधिकारी, कर्मचाऱ्यांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

सातारा - पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी प्रशांत निकम यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पालिका पदाधिकारी आणि  कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

सातारा - पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी प्रशांत निकम यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पालिका पदाधिकारी आणि  कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर काही विक्रेते बसले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशांत निकम काल तेथे गेले होते. तेथील विक्रेत्यांना गाडे हटविण्यास सांगण्याबरोबरच त्यांनी त्यांचे वजन-काटे जप्त केले. तसेच त्यांना दुपारी पालिकेच्या राजवाडा येथील जुन्या कार्यालयात येण्यास सांगितले होते. सायंकाळी चारच्या सुमारास विक्रेते काही युवकांबरोबर तेथे आले. त्यांनी कारवाई करण्याच्या कारणावरून प्रशांत निकम यांना मारहाण केली. याबाबत पाच जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

दरम्यान, प्रशांत निकम यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी आज सकाळी पालिका कार्यालयासमोर जमले होते. त्यांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच संशयितांना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली. या निदर्शनामध्ये नगराध्यक्षा माधवी कदम, नगरसेवक धनंजय जांभळे तसेच अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन देणार 
दरम्यान, प्रशांत निकम यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना देणार निवेदन असल्याची माहिती नगराध्यक्षा माधवी कदम यांनी यावेळी दिली.

Web Title: Municipal Officer Employee Agitation